व्यापाऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफीसाठी प्रयत्न करणार ः चंद्रकांत पाटील

संभाजी गंडमाळे
Thursday, 24 September 2020

कोल्हापूर, ः कोरोनाच्या महामारीमुळे व्यापाऱ्यांच्या कर्जावरील गेल्या सहा महिन्यांचे व्याज माफ होण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

कोल्हापूर, ः कोरोनाच्या महामारीमुळे व्यापाऱ्यांच्या कर्जावरील गेल्या सहा महिन्यांचे व्याज माफ होण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले. 
राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या रौप्यमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त आज झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राजारामपुरीतील सूर्या कॉन्फरन्स हॉलमध्ये कार्यक्रम झाला. 
श्री. पाटील म्हणाले, ""कोरोनाचे संकट कधी संपेल हे सांगता येत नाही; त्यामुळे व्यापाराचे चक्र सुरू राहणे आवश्‍यक आहे. व्यापारी, उद्योजकांचे राज्य सरकार व केंद्राकडील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहोत. राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने संघर्षातून केलेले संघटन व परिसराचा केलेला विकास हा राज्यातील संघटनांसाठी आदर्शवत आहे.'' 
कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी चिकाटीने वर्षे प्रयत्न केले. त्याला यश आले. याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत असोसिएशनसोबत राहू, असेही श्री पाटील यांनी सांगितले. 
असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी असोशिएशनच्या वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमात बोधचिन्ह व कोरोना जनजागर अभियान भित्तिपत्रकाचेही अनावरण झाले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित शाह, "स्मॅक'चे अध्यक्ष अतुल पाटील, महाद्वार रोड व्यापारी संघाचे अध्यक्ष शामराव जोशी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स डीलर असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी उपाध्यक्ष समीर दुधगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश पोकळे यांनी आभार मानले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश कारवेकर, सचिव रणजित पारेख, अनिल पिंजाणी, व्यंकटेश बडे, प्रीतेश दोशी, दीपक पुरोहित, अमित लोंढे, भरत रावल, महेश जेवराणी, स्नेहल मगदूम, प्रताप पवार आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will try to get interest waiver on traders' loans: Chandrakant Patil