पुलाची शिरोली येथे भीषण अपघात; महिला ठार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

साने भरलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीला ब्रिझा मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली.

नागाव (जि. कोल्हापूर) : उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीला ब्रिझा मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले. सविता शांतीनाथ बेडकीहाळे (वय 52, रा. भोज, ता. चिकोडी, कर्नाटक ) असे मृत महिलेचे नाव आहे. वैभव अनंत बडबडे (वय45, रा. आकिवाट, ता. शिरोळ ), सुनीता शीतल शिरहट्टी ( वय 49, रा. तळदंगे, ता. हातकणंगले ), संगीता संजय शिरगावे (वय 45, रा. इचलकरंजी ) व पद्मजा अनिल सौन्दत्ती ( वय 42, रा. भोज, ता. चिकोडी ) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री अडीचच्या सुमारास शिरोली फाटा येथे हा अपघात झाला. 

हे पण वाचा -  काळ आला होता, पण ; आजीच्या धाडसामुऴे टऴला हा अनर्थ

याबाबत घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अपघातातील जखमी शिरहट्टी यांची मुलगी श्वेता ही पुणे येथे डिझाईनिंग इंजिनिअरिंग करत आहे. तिला भेटण्यासाठी त्या व त्यांच्या तीन बहिणी आणि बहिणीचा मुलगा वैभव बडबडे असे पाचजण ब्रीझा मोटार ( एमएच 09 डीएक्‍स 7794) मधून काल पहाटे पुण्याला गेल्या होत्या. संध्याकाळी जेवण करून हे सर्वजण पुण्यातून बाहेर पडले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथील पार्श्वनाथ स्टील समोर मोटर चालक वैभव बडबडे याचा गाडीवरील ताबा सुटल्याने उसाने भरलेल्या ट्रॉलीवर गाडी आदळली. यामध्ये बेडकीहाळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन बहिणी व वैभव असे चार जण गंभीर जखमी झाले. वैभव हा मोटार चालवत असल्यामुळे बेजबाबदारपणे मोटर चालवून उसाच्या ट्रॉली पाठीमागून धडकल्याने त्याच्याविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

हे पण वाचा - भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या विसावला गोठ्यात अन्...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman dead in accident at kolhapur nagaon