भाऊबंदकीच बेतली तिच्या जिवावर; मारून फेकले विहिरीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

भाऊबंदकीच्या शेत आणि विहिरीच्या वादातून महिलेचा खून केल्याची घटना कोथळी (ता. चिकोडी) येथे घडली आहे.

निपाणी (जि. बेळगाव) : भाऊबंदकीच्या शेत आणि विहिरीच्या वादातून महिलेचा खून केल्याची घटना कोथळी (ता. चिकोडी) येथे घडली आहे. कमला श्रीकांत हिरापुरे ( वय ५१ रा. कोथळी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पती श्रीकांत हिरापुरे यांनी खडकलाट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा - धक्कादायक - पळून गेलेल्या मुलीला वडिलांची श्रद्धांजली; गावात लावले मोठे होर्डिंग

घटनेबाबत पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, श्रीकांत हिरापुरे आणि त्यांचे भाऊबंद सुरेश हिरापुरे, कविता हिरापुरे हे कोथळी येथे वास्तव्यास आहेत. शेतजमीन आणि विहिरीच्या कारणावरून या दोन्ही कुटुंबांमध्ये वारंवार भांडण होत होते. दोन दिवसापूर्वी शेत आणि विहिरीवर मृत कमला आणि कविता यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्याचवेळी संशयित आरोपी सुरेश दादू शिरापूर व त्याच्या पत्नीने कमल हिला मारहाण करून शेतात असलेल्या विहिरी जवळ नेऊन तिला पाण्यात ढकलले. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची फिर्याद पती श्रीकांत हिरापूरे यांनी खडकलाट पोलिसात दिली आहे.

हे पण वाचा - मी आयुष्यात एकदाच प्रेम केलं... असं का म्हणाले रोहित पवार..?

श्रीकांत हिरापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निपाणी मंडळ पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली खडकलाट पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ए. पी.  होसमनी, सहाय्यक उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल, आनंद पांडव आणि सहकाऱ्यांनी संशयित आरोपी सुरेश दादू हिरापुरे आणि कविता सुरेश हिरापुरे यांना अटक केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women killed in nipani belgaum