esakal | मी आयुष्यात एकदाच प्रेम केलं... असं का म्हणाले रोहित पवार..?.?
sakal

बोलून बातमी शोधा

rohit pawar I will loved once in my life

राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या प्रेम कहाणीबाबत दिलखुलासपणे भाष्य केलं आहे. कॉलेजमध्ये असताना माझं कुणाबरोबरही प्रेम झालं नाही, अशी थेट कबुली रोहित पवार यांनी दिली.

मी आयुष्यात एकदाच प्रेम केलं... असं का म्हणाले रोहित पवार..?.?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - सध्या व्हॅलेंटाईन डे आठवड्याची धूम सुरु आहे. तरुणाईमध्ये या आठवड्याला विशेष महत्त्व आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या प्रेम कहाणीबाबत दिलखुलासपणे भाष्य केलं आहे. कॉलेजमध्ये असताना माझं कुणाबरोबरही प्रेम झालं नाही, अशी थेट कबुली रोहित पवार यांनी दिली. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे के. बी. पी. कॉलेजच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते.

तरुणांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, “मी मुंबईमध्ये होतो. या सर्व प्रवासात काही प्रमाणात कष्टावर प्रेम होतं. त्यावेळी जीम करायचो. जीमवर प्रेम होतं. पण कॉलेजमध्ये तुम्हा सर्वांना जे प्रेम होतं तसं प्रेम मला काही कधी झालं नाही. व्हॅलेंटाईन डे दोन दिवसांनी येतो आहे. तेही मला व्हॉट्सअप मेसेज पाहत असताना तेव्हा कळालं की दोन दिवसांनी व्हॅलेंटाईन डे आहे. पण बरं झालं आठवलं. तुम्ही सर्वजण ज्या प्रकारच्या प्रेमाचा विचार करतात, तसं प्रेम आयुष्यात मी एकदाच केलं. ते प्रेम माझ्या बायकोवर केलं. हेच प्रेम शेवटपर्यंत राहणार आहे.”

वाचा - वसंतदादांच्या वारसांना शरद पवारांचा सूचक टोला

मी आयुष्यात एकदाच प्रेम केलं, अशी 'व्हॅलेंटाईन डे'च्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांकडून कबुली

“प्रेमाच्या गोष्टी आल्या की शिट्या वाढतात. हे भारी आहे. कॉलेजचं जीवन खूप भारी असतं. मलाही कॉलेजचं जीवन आवडायचं. तेव्हा टेंशन अजिबात नव्हतं. घरुन दोन हजार रुपये महिन्याला यायचे. त्यातच कसातरी महिना निघायचा. कधी पैसे कमी पडले, तर मित्र असायचेच”, असंही रोहित पवार यांनी यावेळी नमूद केलं.

loading image