१९५८ साली अंबाबाई मंदिरातील बुजवण्यात आलेले 'ते' कुंड परत खुले होणार...

The work of opening Mankarnika Kund in Ambabai temple started
The work of opening Mankarnika Kund in Ambabai temple started
Updated on: 

कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाई मंदिरातील मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामाला आजपासून प्रारंभ झाला. १९५८ साली हे कुंड बुजवण्यात आले होते. मात्र, आता देवस्थान समिती ते पुन्हा खुले करणार असून यानिमित्ताने मंदिरातील तीर्थकुंड वैभव पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. ते म्हणाले,"देवस्थान समितीने अतिशय चांगला निर्णय घेतला असून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामाला आता प्रारंभ झाला आहे. लवकरात लवकर हा प्राचीन ठेवा कोल्हापूरकराबरोबरच पर्यटकांसाठीही भुरळ घालणारा ठरेल, यात शंका नाही."

महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, नगरसेविका हसीना फरास, आदिल फरास, विनायक फाळके, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, उपसचिव शितल इंगवले, अभियंता सुदेश देशपांडे ,सुयश पाटील ,व्यवस्थापक धनाजी जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com