VIDEO : भारीच ! कोल्हापुरातील वन विभागाच्या रेस्क्‍यु टीमचे महापुरात 'हे' काम

 work of the rescue team of the forest department in Kolhapur
work of the rescue team of the forest department in Kolhapur

कोल्हापूर - माणुसकी काय असते याची अनेक उदाहरणे कोल्हापुरात पाहण्यास मिळतात. आणीबाणीच्या काळात ही माणुसकी पावलो पावली दिसून येते. गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी अद्याप ताज्या असतानाही नुकताच कोल्हापुरात महापुर सुरू झाला. घुबड, घार, गरुड, साप, नागालाही जीवदान देण्याचे काम कोल्हापुरातील वन विभागीतील रेस्क्‍यु टीमने केले आहे. कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील सोनतळी परिसरात जखमी झालेल्या प्राण्यांना वाचविण्यासाठी अमित कुंभार आणि त्यांच्या टीमची धडपड उघड्या अंगाने सुरू होती. सहा प्राण्यांना त्यांनी जीवदान देवून कोल्हापूरकरांची माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही जगविण्याची जिद्द पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

व्हिडीओ पाहा...

कोल्हापुरात गतवर्षी महापुराने हाहाकार माजविला. त्यावेळी रस्त्यावर अडकेलेल्या प्रवाशांना, मोकाट असलेल्या जणावरांनाही स्वतःच्या घरातून जेवण देण्याची दातृत्व कोल्हापूरकरांनी दाखविले होते. आज पुन्हा अशीच काहीशी स्थिती कोल्हापूरच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. तरीही कोल्हापूरकरांनी हार मानली नाही. कोरोनाची महामारी सुरू असतानाच कोल्हापूर महापुरालाही धाडसाने समोरे जात आहेत. ज्यांना शक्‍य आहे ते स्थलांतर करीत आहेत. मात्र ज्या प्राण्यांना स्थलांतर करण्याची ही स्थिती नाही अशांसाठी वन विभागातील रेस्क्‍युटीमने स्वतः उघड्या अंगाने जावून त्यांना जीवदाने देण्याचे काम सुरू केले आहे.

कोल्हापूर-पन्हाळा मार्ग सध्या पाणी वाढल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे. अशाच स्थितीत सोनतळी परिसरात घुबड, घार, गरूड जखमी अवस्थेत असल्याचे अमित कुंभार आणि त्यांच्या टीमला दिसून आले. त्यांनी तातडीने पुराच्या पाण्यातून जावून त्यांना वाचविले. बिस्कीट पुड्याच्या बॉक्‍स मध्ये त्यांना घेवून सुरक्षित पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. तेथून रस्ते बंद असल्यामुळे एका काठीच्या सहाय्याने वन्यजीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार, अमित कुंभार, त्यांचे सहकारी प्राणी मित्र श्रेयश खबाले, विकी पनदारे, विनायक माळी यांनी प्राण्यांना सुखरूप रस्त्यावर आणले. तेथून पाण्यातून पुढे वाट काढावी लागत असल्यामुळे उघड्या अंगानेच थंडीतही या सर्वच प्राण्यांना त्यांनी कोल्हापूरकडे आणण्याचा प्रयत्न केला. याचवेळी रस्त्यात फिरणाऱ्या नाग आणि सापांनाही त्यांनी पकडून रस्त्यावर झालेल्या बघ्यांची गर्दीपासून त्यांची सुटका केली.

सोनतळीपासून वडणगे फाट्यापर्यंत येताना त्यांना आणखी एका झाडाजवळ नाग आणि मण्यार दिसले. तेथून त्यांना आपल्या बरोबर घेवून ही टीम थेट कोल्हापूरकडे निघून आली. याचवेळी वडणगे फाट्यावर तीनही बाजूला पाणी असल्यामुळे सैरभैर झालेल्या तीन कुत्र्यांना आपल्या सोबत घेवून त्यांना शहर परिसरातील रिकाम्या माळावर आणून सोडले. तर प्राण्यांना वन्य विभागातील डॉक्‍टरांकडे सोडून त्यांचा जीव वाचविला. गरूडाच्या पंखांना दुखापत झाली होती होती. तर इतर प्राण्यांनाही काही ठिकाणी जखमा झाल्या होत्या. असेही माहिती पथकाचे प्रमुख अमित कुंभार यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com