esakal | उचंगी प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्तांनी पाडले बंद

बोलून बातमी शोधा

The Work Of Uchangi Project Was Stopped By The Project Affected People Kolhapur Marathi News}

आजरा येथील उचंगी प्रकल्पाच्या सांडव्याचे काम आज प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले. चाफवडे, जेऊर व चितळे येथील प्रकल्पग्रस्त एकत्र आले होते.

उचंगी प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्तांनी पाडले बंद
sakal_logo
By
रणजित कालेकर

आजरा : येथील उचंगी प्रकल्पाच्या सांडव्याचे काम आज प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले. चाफवडे, जेऊर व चितळे येथील प्रकल्पग्रस्त एकत्र आले होते. पुनर्वसनासह अन्य मागण्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली होती. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला पंधरा दिवसापुर्वी दिले होते. त्याबाबात प्रशासन पातळीवरून कोणतीही हालचाल न झाल्याने आज प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाचे काम बंद पाडले. 

संजय तर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त प्रकल्पस्थळी गेले. त्यांच्या सोबत सुरेश पाटील, प्रकाश मटकर, प्रकाश मंणकेकर, संजय भडांगे, निवृत्ती बापट, रघुनाथ धडाम यासह प्रकल्पग्रस्त होते. त्यांनी काम बंद पाडले. 

तर्डेकर म्हणाले, ""गत चार महिन्यात प्रकल्पग्रस्तांच्या बैठका प्रशासनासोबत झाल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा पातळीवरचे मुद्देमध्ये संकलन दुरुस्ती, चाफवडेच्या दीडशे घरांचा संपादनाच प्रश्‍न, उजव्या तिरावरील रस्त्याचे काम यासह अनेक मागण्या वीस वर्ष रखडल्या आहेत. हे प्रश्‍न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. प्रश्‍न सुटेपर्यंत सांडव्याचे काम बेमुदत बंद करणार आहे. पुनवर्सनाचे काम मार्गी लागेपर्यंत कोणतेही काम करू देणार नाही.'' 

या वेळी कार्यकारी अभियंता अमोल नाईक व उपकार्यकारी अभियंता राठोड यांनी प्रकल्पग्रस्तांनी काम सुरू करु देवून सहकार्य करावे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावू, असे सांगितले. पण प्रकल्पग्रस्तांनी त्यांची विनंती मान्य केली नाही. 

कायदा धाब्यावर नको 
आंबओहळमध्ये कायदा धाब्यावर ठेवून प्रकल्पाचे काम सुरू आहे. याचा निषेध या वेळी करण्यात आला. असा प्रकार अन्य प्रकल्पाबाबत झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असाही इशारा या वेळी देण्यात आला. 

संपादन- सचिन चराटी

kolhapur