
कोल्हापूर : लहान असल्यापासूनच नदीला पोहणं आणि शेतातील कष्टाची कामं करायचो. योगा शिकलो आणि तेव्हापासून आजतागायत पहाटे चारलाच रोजचा दिवस सुरू होतो. सकाळी उठले की पहिल्यांदा दीड तास योगा आणि व्यायाम हा नेम आजवर कधीच चुकला नाही. त्यामुळेच आज ९९ वा वाढदिवस साजरा करून शंभरीत येऊ शकलो...शंकरराव साहेबराव भोईटे संवाद साधत असतात आणि त्यांच्या परिवारातील सारे सदस्य भारावून जात असतात.
श्री. भोईटे यांचा हा सारा प्रवास म्हणजे केवळ त्यांच्या गोतावळ्यालाच नव्हे तर साऱ्यांनाच आदर्श ठरत आहे. (रविवारी) साजऱ्या होणाऱ्या जागतिक योगा दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यांचा ९९ वा वाढदिवस साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा करीत त्यांनी परिवारातील सर्व सदस्यांशी संवाद साधला, असे ज्योती घाटगे यांनी सांगितले.
हल्ली वयाच्या विशीपासूनच विविध व्याधी मागे लागतात आणि त्या आयुष्यभर कधीच साथ सोडत नसल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. मात्र, श्री. भोईटे यांचा आजही या वयात सकाळी चारलाच दिवस सुरू होतो. सलग एक ते दीड तास योगा आणि व्यायाम ते करतात. सकाळी उठल्यानंतर स्वतःचा चहा स्वतः बनवतात. शेतीतील कष्ट आता नसले तरी बागकाम मात्र न चुकता करतात. त्यांच्या या योगा व व्यायामाच्या प्रेमाचा संस्कार त्यांच्या गोतावळ्यावरही झाला आहे आणि म्हणून सर्व जण रोज न चुकता योगा करतात.
कोल्हापूर, वाई, औरंगाबाद, सातारा, मुंबई आदी परिसरात त्यांचा हा सारा गोतावळा विखुरला असला तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ते किमान सोशल मीडियाच्या व फोनच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात. त्यांची चौथी पिढीही आता त्यांच्याकडून योगाचे प्रशिक्षण घेऊ लागली आहे. त्याशिवाय विविध योगा वर्गातही ते जाऊन मार्गदर्शन करत असतात.
एक साधी गोळीही नाही...
श्री. भोईटे यांची योग व व्यायामाची साधना त्यांना या वयातही टवटवीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. बीपी, शुगर असला कुठलाही प्रकार त्यांना कधीच माहिती नाही. किंबहुना एक साधी गोळीसुध्दा त्यांना कधी घ्यावी लागली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.