पूर नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाने यंदा प्रथमच असे केले नियोजन

This Year For Flood Control Slowly Filling The Dam Kolhapur Marathi News
This Year For Flood Control Slowly Filling The Dam Kolhapur Marathi News

आजरा : चित्री प्रकल्पात 691 दसलक्ष घनफूट म्हणजे 37 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात 800 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदा प्रशासनाने पूर नियंत्रणासाठी कुर्मगतीने धरण भरण्यावर भर दिला असल्याचे पाटबंधारेचे आजरा शाखाधिकारी एन. डी. मळगेकर यांनी सांगितले. 

गडहिंग्लज व आजरा तालुक्‍याला वरदान ठरलेला चित्री प्रकल्प असून, 1886 दशलक्ष घनफूट इतकी या प्रकल्पाची क्षमता आहे. पावसाळ्यात हा प्रकल्प दरवर्षी कधी भरतो, याकडे शेतकऱ्यांबरोबर प्रशासन, गडहिंग्लज व संकेश्‍वरवासीयांचे लक्ष लागून राहिलेले असते. कारण गडहिंग्लज व संकेश्‍वरच्या काही भागांत उपलब्ध पाण्यावर पिके, उद्योग व पाण्याचे दरवर्षीचे नियोजन केले जाते. मात्र पुराचा धोका लक्षात घेवून महिनाभरापूर्वी पूर नियंत्रणासाठी या प्रकल्पातील 25 टक्के राखीव साठ्यातील पाच टक्के पाणी सोडले होते.

पूरपरिस्थिती तयार होऊ नये यासाठी प्रशासनाने यंदा प्रथमच हा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांत धुवॉंधार पाऊस झाल्याने या प्रकल्पात 37 टक्के पाणीसाठा झाला आहे. महिनाअखेर या प्रकल्पात पन्नास टक्केवर पाणीसाठा झाला, तर वीज गृहातून पाणी सोडून विसर्ग सुरू ठेवला जाणार आहे.

पूरनियंत्रणासाठी धरण धिम्या गतीने भरावे यासाठी नियोजन केले गेले आहे. तालुक्‍यातील धनगरमोळा प्रकल्प आठ दिवसांपूर्वीच पूर्ण क्षमतेने भरला आहे. खानापूर प्रकल्पात 15 व एरंडोळमध्ये 70 टक्के पाणीसाठा झाला आहे. 

kolhapur

संपादन ः सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com