यंदाचा पावसाळा होणार विना धाकधुकीचा

This year's rains will be without any hassle
This year's rains will be without any hassle
Updated on

कोल्हापूर ः कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थानासाठी रत्नागिरीतून एका तर गोव्यातून दोन तासांत कोस्ट गार्डची टीम हेलिकॉफ्टरच्या माध्यमातून पोहचेल, असा विश्‍वास एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी आज दाखवला. संभाव्य पूरस्थिती आणि 
आगामी पावसाळ्याची पूर्वतयारी ऑपरेशन जलप्रलय अनुषंगाने कोल्हापूर विमानतळाची पाहणी आज भारतीय तटरक्षक दलाकडून करण्यात आली.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात ही त्यांनी आढावा घेतला. गोवा येथील पथकाचे कमांडंट अमित कोरगावकर आणि कमांडंट अशोक यादव यांनी आयसीजी चेतकच्या माध्यमातून कोल्हापूर, रत्नागिरी परिसराची आणि कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विमानतळाचाही आढावा घेतल्याची माहिती विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

गतवर्षी आलेल्या महापुराच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या पावसाळ्यातील दक्षता जलप्रलयातील बचावाची पूर्वतयारीची आज भारतीय तट रक्षक दलाच्या गोवा येथील पथकाने पाहणी करुन समाधान व्यक्त केले. विमानतळावरील एएनएस, एटीएम / एटीएस, रनवे, टॅक्‍सी वे, एप्रॉन, रिफाईलिंग सुविधा, एमईटी सुविधा, ई व एम सेवा व इतर सर्व सेवा आगामी पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध आहेत काय याची त्यांनी पाहणी केली. आगामी पावसाळ्यात कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर विमानतळ पूर्णपणे सक्षम असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. 
संभाव्य पूरस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, इंडियन कोस्ट गार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापना संदर्भात विशेष हेलिकॉप्टरने आलेले एनडीआरएफचे कमांडन्ट अमित कोरगांवकर व अशोक यादव यांनी विमानतळाची पाहणी केली. दुपारी तब्बल तीन तास ते विमानतळावर होते. जिल्ह्याचीही त्यांनी हवाई पाहणी केली. 

हैदराबाद सेवा सुरळित 
आज तिसऱ्या दिवशीही अलायन्स एअरची विमानसेवा हैदराबाद ते कोल्हापूर कोल्हापूर ते हैदराबाद अशी अखंडितपणे सुरू राहिली. हैदराबाद वरून नऊ प्रवाशांचे कोल्हापुरात आगमन झाले तर 15 प्रवाशी हैदराबादकडे रवाना झाले. येथे वैद्यकीय तपासणी करूनच सर्वांना पुढे पाठविले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com