डॉ. तात्याराव लहाने यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार...

This year's Rajarshi Shahu Award went to Announcing that it will be given to Tatyarao Lahane
This year's Rajarshi Shahu Award went to Announcing that it will be given to Tatyarao Lahane

कोल्हापूर - येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार वैद्यकीय शिक्षण संचालक व ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केली.

कोरोनाची सद्य परिस्थिती अशीच राहिल्यास या पुरस्कार वितरणाचा जाहीर कार्यक्रम न करता डॉ. लहाने यांना प्रत्यक्ष भेटून हा पुरस्कार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाजप्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आतापर्यंत विविध क्षेत्रातील 34 जणांना या पुरस्काराने गौरविले आहे. त्यांत भाई माधवराव बागल, व्ही. शांताराम, डॉ. बाबा आढाव, डॉ. एन. डी. पाटील, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आदींचा समावेश असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.

बिनटाक्‍याच्या नेत्र शस्त्रक्रियांसाठी ते प्रसिध्द

यंदाचा पुरस्कार 35 वा असून डॉ. लहाने यांच्या वैद्यकीय कार्याची दखल घेवून त्यांना पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे. राजर्षी शाहूंच्या विचारांप्रमाणे सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या एकूणच कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. बिनटाक्‍याच्या नेत्र शस्त्रक्रियांसाठी ते प्रसिध्द असून सामाजिक बांधिलकी जपत एक लाख साठ हजाराहून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या आहेत. 2008 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.


राजर्षी शाहू महाराजांबद्दल अत्यंत आदर आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही माझ्या दृष्टीने आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या शाहू महाराजांच्या भूमीत मी दहा वर्षे नेत्र शिबिरे केली. त्या भूमीतला राज्यातला नव्हे तर देशातील सर्वात मोठा हा पुरस्कार असल्याचे मी मानतो. हा पुरस्कार मला पुढील सामाजिक काम करण्याची प्रेरणा देईल.
- डॉ. तात्याराव लहाने (वैद्यकीय शिक्षण संचालक)

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com