शाहूवाडीचे योगीराज गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

हसन मुश्रीफांनी केले स्वागत ः मुश्रीफ यांच्यावर विश्वास ठेवूनच पक्ष प्रवेश-गायकवाड 

कोल्हापूर :  शाहुवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर श्री. गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांचा स्वागतपर सत्कार झाला. 

यावेळी श्री. मुश्रीफ म्हणाले, "योगीराज गायकवाड यांचा पक्षप्रवेश हा कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला बळकटी देणारा आहे. त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाच्या भावनेने पक्षप्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.' 
श्री. गायकवाड म्हणाले,"राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील व कोल्हापूर जिल्ह्याचे नेते ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश करीत आहोत. माजी आमदार स्वर्गीय कै. संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर जनता पोरकी झाली होती. त्यांच्याप्रमाणेच श्री. मुश्रीफ यांच्या कामाची पद्धतही गोरगरीब जनतेला केंद्र मानून आहे.' 

हेही वाचा- मध्यरात्रीचा अंदाज घेत तरुणाचा फिल्मीस्टाईलने केला पाठलाग अन् -

यावेळी उत्तम पाटील- सुपात्रे, विद्यानंद यादव -बांबवडे, विजय पाटील -थेरगाव, संदीप केमाडे- सैदापूर, शिवाजी गावडे- वालूर, सुभाष पाटील- पिशवी, सुभाष कांबळे - भाततळी, बाबू कांबळे- शेंबवणे, रावजी कांबळे- मांजरे, भास्कर कांबळे -घोळसावडे, अजित पिंपळे- पिंपळेवाडी, प्रमोद घाडगे, सागर आळवेकर, भाऊसाहेब घाडगे आदी प्रमुख उपस्थित होते. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yogiraj Gaikwad of Shahuwadi joins NCP