दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

धोत्रेवाडी येथील मानेगल्ली परिसराच्या वळणावर अपघात झाला. मोटारसायकल चालक विक्रम यादव याच्यावर गुन्हा कासेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे

नेर्ले - धोत्रेवाडी (ता.वाळवा) येथील वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला समोरासमोर मोटारसायकलची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. प्रसाद पोपट ताटे( वय २० रा.धोत्रेवाडी,ता. वाळवा) असे ठार झालेल्या युवकाचे नाह आहे तर मोटारसायकल चालक विक्रम सुरेश यादव(वय २२रा.धोत्रेवाडी) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात आज बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला.

धोत्रेवाडी येथील मानेगल्ली परिसराच्या वळणावर अपघात झाला. मोटारसायकल चालक विक्रम यादव याच्यावर गुन्हा कासेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ट्रॅक्टरचालक नामदेव प्रल्हाद शिंदे (रा. नरसिंहपूर ता.वाळवा वय २५)याने  कासेगाव पोलिसात अपघाताची फिर्याद दिली. 

कासेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, धोत्रेवाडी येथील  विक्रम जाधव व प्रसाद ताटे हे दोघेजण कासेगावहून मोटारसायकल (एम. एच.१० बी. के.११७४) वरून धोत्रेवाडीकडे निघाले होते. यावेळी समोरून धोत्रेवाडी येथील मानेगल्ली परिसराच्या वळणावर ट्रॅक्टरचालक नामदेव प्रल्हाद शिंगे हे विटा भरून ट्रॅक्टर क्रमांक( एम.एच.२४ डी.१९०१) घेऊन कासेगावकडे चालले होते. यावेळी मोटरसायकल चालक विक्रम यादव व प्रसाद ताटे यांची ट्रॅक्टरला समोर धडक बसली.

हे पण वाचा बेटिंग घेणाऱ्या सात जणांना अटक ; इचलकरंजीत दोन छापे

पाठीमागे बसलेल्या प्रसाद याच्यासह गाडी घसरून फरफटत ट्रॉलीला जाऊन धडकली. यावेळी मोटरसायकल चालक विक्रम यादव हा जखमी झाला तर पाठीमागे बसलेला प्रसाद ताटे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी इस्लामपूर येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. प्रसादच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलिस फौजदार जयकुमार उथळे अधिक तपास करीत आहेत.  

 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young boy dead in accident at walwa sangli