'तो' तरुण कोरोना पाॅझिटिव्ह निघाला अन् भुदरगड तालुका हादरला....

 young man come from Mumbai to Tambale bhudargad is corona positive
young man come from Mumbai to Tambale bhudargad is corona positive

कडगाव - तांबाळे (ता. भुदरगड) येथील मुंबई वरून तांबाळे कडे येणाऱ्या तरुणांची कोरोना टेस्ट कोल्हापूर येथे पॉझिटिव्ह सापडल्याने तांबाळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. परंतु सदर व्यक्ती गेली वर्षभर तांबाळे गावी कोणाच्याच संपर्कात आली नसल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.        

कोरोना बाधित तरुण हा मुंबईवरून आल्यानंतर कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात तपासणी करून त्यास शिवाजी विद्यापीठात संस्था विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

तरुणांचे कुटुंब हे गोव्यात

तांबळे येथील कोरोना बाधित तरुण गावी येण्याकरिता नऊ  मे ला निघाला होता.मुंबई वरून कोल्हापूर पर्यंत ट्रक मधून आला.त्यानंतर किणी टोल नाक्यावर त्याची प्राथमिक तपासणी करून सी.पी.आर. मध्ये स्वॅब घेण्यात आले व शिवाजी विद्यापीठात संस्थात्मक विलीगीकरण कक्षात ठेवले होते. आज शनिवारी (ता.१६) रोजी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचारासाठी त्याला सी.पी.आर. मध्ये दाखल करण्यात आले आहे.
 सदर तरुणांचे कुटुंब हे गोव्यात राहतात. कोरोनाग्रस्त रुग्ण हा कामानिमित्त मार्च महिन्यात मुंबईला गेला होता.

चौकशी करून स्थानिक कमिटीस सूचना

तांबाळे येथे भुदरगड पोलीस निरीक्षक संजय पतंगे,संतोष भांदिगरे,महादेव अबीटकर,तुकाराम सूर्यवंशी यांनी चौकशी करून स्थानिक कमिटीस सूचना दिल्या.या वेळी सरपंच शालू डिसोझा,पोलीस पाटील रवींद्र सूर्यवंशी व स्थानिक कमिटी सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com