esakal | ब्रेकिंग- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने वार करून खून 
sakal

बोलून बातमी शोधा

young man murder in belgaum

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, मयत सल्लाउद्दीन आणि संशयितामध्ये जुना वाद होता.

ब्रेकिंग- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने वार करून खून 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : भांडण सोडविण्यासाठी गेल्या तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करुन निर्घुन खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गुरुवार (ता.27) रात्री 11.30 च्या सुमारास काकती येथील टीसीआय पेट्रोलपंपनजिक ही घटना घडली असून सल्लाउद्दीन नजिरसाब पकाली (वय 32, रा. मुस्लीम गल्ली काकती) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी तन्वीर इमामहुसेन मुल्ला (वय 18, रा. काकती) याने दिलेल्या फिर्यादीनुसार अमर शाम मेत्री, अखील शिवाप्पा मेत्री (रा. आंबेडकर गल्ली काकती) यांच्यासह अन्य दोघा संशयिताविरोधात शुक्रवारी (ता. 28) पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. 

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, मयत सल्लाउद्दीन आणि संशयितामध्ये जुना वाद होता. गुरुवारी (ता.27) रात्री फिर्यादी तन्वीर आणि त्याचा मित्र फैजान फारुक घिवाले हे दोघे काकती येथील शाळेनजिकच्या मोहरम निमीत्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आटोपून घरी निघाले होते. त्यावेळी काकती येथील टीसीआर पेट्रोल पंपनजिकनजिच्या सेवा रस्त्यावर संशयित अमर, अखील आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अन्य दोघांचे बेळगावातील तीन तरुणासोबत वादावादी सुरु होती. त्यामुळे फिर्यादी व त्याच्या मित्राने भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती केली. त्यावेळी सल्लाउद्दीन हा मलिकजान मिरासाब दर्गावाले याच्यासोबत तेथे आला.

हे पण वाचा -  कोरोनासोबत जगणारे देशातील पहिलेच राज्य

 सल्लाउद्दीन हा देखील भांडण सोडविण्यासाठी गेला असता भांडण सोडविणारा तू कोण असे म्हणत दोघा संशयितासह त्यांच्या अन्य दोघा साथिदारांनी सल्लाद्दीनला अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करुन घट्ट पकडले. त्यानंतर बुक्‍यांनी बेदम मारहाण करुन त्याच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले. त्यामुळे गंभीर जखमी होउन रक्‍तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळला. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णायलयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री 12.30 च्या सुमारास त्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेउन पंचनामा केला.

हे पण वाचाकर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच पोलिसांच्या उपस्थितीत अंधारात  बसवला रायण्णा यांचा  पुतळा

संपादन - धनाजी सुर्वे 

go to top