हातगाडा चोरीच्या संशय़ावरून मारहाणीत फिरस्त्या तरुणाचा मृत्यू

राजेश मोरे
Monday, 21 September 2020

कोल्हापूर, ः तावडे हॉटेल कमानीजवळ हात गाडी चोरल्याच्या संशयावरून लोखंडी पाईपने झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या फिरस्त्या तरूणाचा मृत्यू झाला. विजय दत्ता मोरे (वय 35, रा. तावडे हॉटेल परिसर) असे त्यांचे नाव आहे. 
 

कोल्हापूर, ः तावडे हॉटेल कमानीजवळ हात गाडी चोरल्याच्या संशयावरून लोखंडी पाईपने झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या फिरस्त्या तरूणाचा मृत्यू झाला. विजय दत्ता मोरे (वय 35, रा. तावडे हॉटेल परिसर) असे त्यांचे नाव आहे. 
याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोघा संशयितावर खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. 
अटक केलेल्या संशयितांची नावे ः आकाश शशिकांत जाधव (वय 40, रा. शिवाजी पेठ) आणि निलेश अनिल मुसळे (वय 32, रा. आर. के.नगर) अशी आहेत. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, विजय दत्ता मोरे हे फिरस्ते असून सध्या तावडे हॉटेल कमानीजवळ राहत होते. त्यांना 16 सप्टेंबरच्या रात्री ते जखमी झाले होते. त्यांना दुसऱ्या दिवशी परिसरातील नागरिकांच्या मदतीने कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा शुक्रवारी (ता.18) सकाळी मृत्यू झाला. अकस्मित मृत्यूची प्राथमिक नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. घटनास्थळाची पोलिसांनी भेट दिली. त्यावेळी येथील एका प्रत्यक्षदर्शी महिलेने 16 सप्टेंबरला रात्री घडलेल्या प्रकार पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. 
तपासाच महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. विजय मोरे हे तावडे हॉटेल परिसरातील एका झोपडीत 16 सप्टेंबरच्या रात्री आले. त्यांना लाल रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरूणांनी हातगाडी चोरल्याच्या संशयावरून लोखंडी पाईपने पायावर जबर मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी झालेल्या गोंधळाने परिसरातील एक महिला धावत तेथे आली. तिला पाहून हल्लेखोर तेथून पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार दोघे संशयित पोलिसांच्या हाती लागले. त्यांनी आपली नावे आकाश जाधव व निलेश मुसळे असल्याचे सांगितले. त्यांना रात्री अटक करण्यात आली. 

सीसीटिव्ही आला मदतीला 
तरुणांच्या अकस्मिक मृत्यूची नोंदीवरून शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने या खूनाचा छडा लावला. त्यासाठी परिसरातील सीसी टीव्हीची मदत त्यांनी घेतली. या कामात पथकाला सहायक पोलिस हवालदार राजू वरक व पोलिस हवलदार तानाजी चौगुले यांची मदत मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young man was beaten to death on suspicion of stealing a handcart