काळा बाजार करून पसार तरुणाचा चकवा

The young man who passed by the black market
The young man who passed by the black market
Updated on: 

बाजार भोगाव (कोल्हापूर)  ः पन्हाळा तालुक्‍यातील पोर्ले तर्फ बोरगावच्या स्वस्त धान्य दुकानातून रेशनचा नऊ पोती गहू परस्पर विक्रीसाठी नेणाऱ्या कामगारावर कळे पोलिसांत गुन्हा दाखल झाला. आज याप्रकरणी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दरम्यान, संबंधित कामगार गेले दोन दिवस पोलिसांना चकवा देत आहे.

सोमवारी (ता. 9) पोर्ले येथील भराडीदेवी सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून रेशनचा गहू विक्रीसाठी नेताना पोहाळवाडीपैकी भोगलेवाडी (ता. पन्हाळा) येथे बाबासो पांडुरंग जाधव याला पकडले. रिक्षातून तेथे त्याने नेलेल्या नऊ पोती गव्हाचा पंचनामा तालुका पुरवठा अधिकारी विजय बुराण यांच्या पथकाने करुन सुमारे 360 किलो गव्हासह पोर्लेतील दुकानातील दप्कर व पॉज मशिन ताब्यात घेतले. श्री. बुराण यांनी दुकानाचा कामगार बाबासो जाधव याच्याविरुद्ध अपहाराची फिर्याद दिली. 
दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी आज घटनास्थळी भोगलेवाडी येथे भेट देवून पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. पोर्लेतील संबंधित दुकानाच्या परवानाधारक शोभाताई नामदेव लाड यांच्याकडे चौकशी केली.

आज पंचनामा व साक्षीदारांचे जबाब घेतले असून गुन्ह्यात वापरलेल्या ऍपे रिक्षाचा तपास सुरू आहे. लवकरच संशयित आरोपी बाबासो जाधव व संबंधित रिक्षा ताब्यात घेऊ. 
श्रीकांत इंगवले, सहायक पोलिस निरीक्षक, कळे 

भराडीदेवी शासनमान्य धान्य दुकानातील गहू परस्पर विक्रीसाठी नेण्याचा प्रकार गंभीर असून संबंधित दुकानावर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे याबाबतचा अहवाल आज पाठवला आहे. 
- रमेश शेंडगे, तहसीलदार, पन्हाळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com