बेकिंग ; पंचगंगा नदीत बुडून युवकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 March 2020

सद्दाम हा आज दुपारी जेवण केल्यानंतर नदीपात्रात गेला होता. मात्र तो नेमका पोहावयास गेला होता की पात्रातून पलीकडे हुपरीकडे जाण्यासाठी जात होता हे समजले नाही

इचलकरंजी - पंचगंगा नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. हातकणंगले तालुत्यातील चंदूर येथे ही घटना घडली असून सद्दाम हुसेन ( वय 22 मूळ समस्तीपुर ,बिहार सध्या राहणार चंदुर )असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. नदीपात्रातून इकडून तिकडे चालत जाण्याचा प्रकार आज त्या युवकासाठी जीव गमवायास लावणारा ठरला. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सद्दाम हा मूळचा बिहारचा असून तो सात महिन्यापूर्वी चंदुर (ता. हातकणंगले)  येथील शाहू नगर गल्ली नंबर 17 मध्ये एक खोली भाड्याने घेऊन एकटाच राहत होता. परिसरात असलेल्या एका पोकलॅण्डवर तो  काम करत असल्याचे समजते. चंदुर येथील नदीपात्रातून चालत जात पलीकडे हुपरीला जाण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू असतो. जेमतेम गुडघ्यापेक्षा अधिक पाण्यातून नागरिक सहजपणे ये-जा करण्याचे प्रकार अनेक वेळा जीवघेणे ठरतात.

हे पण वाचा - देशात चाललय काय अन् हे पळवताहेत रस्त्यावरून कुत्री 

सद्दाम हा आज दुपारी जेवण केल्यानंतर नदीपात्रात गेला होता. मात्र तो नेमका पोहावयास गेला होता की पात्रातून पलीकडे हुपरीकडे जाण्यासाठी जात होता हे समजले नाही. पात्रातून काही अंतरावर चंदुर नदीपात्रात एक डोह आहे. या डोहाचा अंदाज अनेक वेळा येतच नाही. चालत चालत जात असताना ते या डोहा मध्येच अडकल्याची शक्यता घटनास्थळावरून व्यक्त होती. काही नागरिक चालत जात असताना त्यांच्या पायाला मृतदेह लागला. त्यामुळे त्यांनी तो मृतदेह पात्राच्या कडेला आणून ठेवला असल्याचे समजते.

हे पण वाचा - शिवकुमार- सिध्दरामय्यांची पक्षसंघटनेवर चर्चा ; राजकीय वर्तुळात महत्त्व 

दरम्यान, घटनास्थळी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस दाखल झाले आहेत. नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. मात्र प्रत्यक्षात ही घटना हुपरी हद्दीत येत असल्यामुळे मृतदेह हुपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी इचलकंजी पोलिस थांबून होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth dies after drowning in Panchganga river