शिवकुमार- सिध्दरामय्यांची पक्षसंघटनेवर चर्चा ; राजकीय वर्तुळात महत्त्व

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 March 2020

लोकसभा निवडणूक आणि अलिकडेच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील पक्षाचा पराभव, आमदारांची झालेली हकालपट्टी आदी विषयावर शिवकुमार- सिध्दरामय्या यांच्यात चर्चा झाली. अंतर्गत मतभेद बाजूला सारून पक्ष संघटनेला कशी चालना द्यायची यावर दोघांनी चर्चा केली. 

बंगळूर : कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे नुतन अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते सिद्धरामय्या यांची भेट घेऊन पक्षसंघटना व पुढील रणनितीवर तासभर चर्चा केली. जेष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांचीही भेट घेऊन शिवकुमार यांनी त्यांचेही मार्गदर्शन घेतले. बंगळूरमधील शिवानंद चौकातील सिद्धारमय्या यांच्या निवासस्थानी जाऊन शिवकुमार यांनी त्यांच्याशी चर्चा केली. 

हे पण वाचा - अंबाबाई अन् जोतिबा मंदिर दर्शनासाठी बंदचा काय निर्णय...? 

दिनेश गुंडुराव यांचा राजीनामा मंजूर करून शिवकुमार यांची केपीसीसी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीवरून शिवकुमार व सिध्दरामय्या यांच्यात मतभेद होते. अखेर दोन्ही गटांना खुश करण्यासाठी दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून कॉंग्रेस हायकमांडने दोन्ही नेत्यांना पक्षसंघटनेसाठी संघटित कार्य करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीला राजकीय वर्तुळात महत्त्व देण्यात येत आहे. 

लोकसभा निवडणूक आणि अलिकडेच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील पक्षाचा पराभव, आमदारांची झालेली हकालपट्टी आदी विषयावर शिवकुमार- सिध्दरामय्या यांच्यात चर्चा झाली. अंतर्गत मतभेद बाजूला सारून पक्ष संघटनेला कशी चालना द्यायची यावर दोघांनी चर्चा केली. 

पक्षाच्या कार्यकर्त्यांना धैर्य देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी राज्याचा प्रवास करून मेळाव्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. 

हे पण वाचा - ब्रेकिंग : गुहागर - चिपळूण - रत्नागिरी मार्ग ठप्प.... 

खर्गेची भेट 
सदाशिवनगर येथील मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी जाऊन शिवकुमार यांनी त्यांच्याशीही चर्चा केली. शिवकुमार यांच्या नियुक्तीस सुमारे तीन महिन्यांचा विलंब झाला होता. ज्यांनी आपणास विरोध केला, त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. दिल्लीत हायकमांडच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार असल्याचे समजते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Kumar: Discussion of Siddaramaiah party organization