झांज पथकांना कोरोनामुळे सुपारी नाही

Zanj squads don’t have betel nut because of the corona
Zanj squads don’t have betel nut because of the corona
Updated on

कोल्हापूर : वीस झांज, दहा ढोल व चार ताशांच्या दणदणाटाने कार्यक्रमाला रंग चढतो. नजाकतदार चाली सादर करत पथकातील कलाकार नागरिकांना खिळवून ठेवतात. किमान चार-ते पाच तास ते अंगातील कौशल्य दाखवून मने जिंकतात. यंदा कोरोनाच्या हाहाकाराने जिल्ह्यातील झांजपथकांत सन्नाटा पसरला आहे. संचारबंदीमुळे कोणत्याही कार्यक्रमाची सुपारी त्यांना मिळालेली नाही. ना सराव ना कार्यक्रम, या परिस्थितीमुळे त्यांच्या करमणुकीच्या माध्यमाला "ब्रेक' मिळाला आहे. 
जिल्ह्यातील प्रत्येक गावात तालीम, झांजपथक, धनगरी ढोल अथवा बॅंड पथक पाहायला मिळत होते. काळानुरूप त्यांची संख्या घटली असली तरी अजूनही काही गावात ही पथके आहेत. शिवजयंती, गणेशोत्सव, दसरा, यात्रा-जत्रा, राजकीय मिरवणुकांत त्यांना मानाचे स्थान असते. शेती, एमआयडीसी, एमएसईबी, व्यवसायांत कार्यरत असणारे कार्यकर्त्यांचा पथकात सहभाग असतो. एखाद्या कार्यक्रमातून खिशात किती मानधन पडणार, यापेक्षा मनोरंजनाचे माध्यम म्हणून ते पथकांत आपले कौशल्य सादर करतात. मर्दानी खेळाचे धडे घेतलेले कार्यकर्ते कार्यक्रमांत युद्धकलेची प्रात्यक्षिकेही दाखवतात. 
झांजपथक स्थापन करणे तितकेसे सोपे काम नाही. दोन लाख रूपयांहून अधिक गुंतवणूक त्यांना करावी लागते. प्रत्येक कलाकारासाठी कीट, बूट खरेदी करावे लागतात, शिवाय ढोल, झांज, ताशांची खरेदी करावी लागते. यंदा झांजपथकांवर कोरोनामुळे संक्रात आली आहे. कोरोनामुळे संचारबंदी जाहीर झाल्याने रात्रीच्या वेळी त्यांना सरावाची संधी मिळाली नाही. त्याचबरोबर शिवजयंती, गणेशोत्सव मिरवणुकांवर बंदी असल्याने त्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्यावर मर्यादा आली आहे. 
येवती (ता.करवीे) येथील धर्मवीर संभाजीराजे तरूण मंडळ, राजे शिवाजी तरूण मंडळ, हनुमान व्यायाम मंडळ, सनी स्पोर्टस व सिद्धार्थ झांजपथक मंडळातील कलाकार अस्वस्थ आहेत. कोरोनाचे संकट कधी एकदा दूर होते, याची प्रतीक्षा त्यांना लागली आहे. 

यंदा कोरोनामुळे झांजपथकांना कोणत्याही कार्यक्रमाचे आमंत्रण नाही. पथकांचा सरावही बंद आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशीच कलाकार प्रार्थना करत आहेत. जेणेकरून त्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. 
- उमेश सूर्यवंशी, अध्यक्ष, धर्मवीर संभाजीराजे तरूण मंडळ. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com