'तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण नक्की बरे व्हाल', कोरोना मुक्तांच्या शब्दांनी बदलतेय मानसिकता 

corona treatment.jpg
corona treatment.jpg

'सोलापूरः तुम्ही टेन्शन घेऊ नका, हॉस्पिटलमध्ये जाऊन बरे व्हा, मी आताच कोरोनातून बरा होऊन आलोय हे संवाद कोरोना संसर्ग झालेले नातेवाईक, रुग्ण व शेजाऱ्यांना दिलासा देणारी ठरू लागली आहेत. रुग्णालयात भरती होणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये भक्कम झालेली मानसिकता डॉक्‍टरांसाठी समाधानकारक व उपचाराबद्दलचा आत्मविश्‍वास वाढवणारी ठरू लागली आहे. 
शहरातील विविध हॉस्पिटलमधून कोरोना रुग्णांचा झटपट शोध, वेगवान उपचार व्यवस्थापनासोबत बरे झालेल्या रुग्णांकडून त्यांचे नातेवाईक, शेजारी व मित्रामध्ये होत असलेल्या संवादाचा सकारात्मक परिणाम उपचारासाठी अत्यंत उपयोगी ठरू लागला आहे. 

शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. आजाराची साथ शहरात सुरवातील पसरत असताना या आजाराबद्दलची माहिती नसणे, मृत्यूची धास्ती निर्माण होणे या सह अनेक नकारात्मक बाबी मोठ्या प्रमाणात प्रभावी होत्या. रुग्णांची मानसिकता सातत्याने निराशाजनक असायची. 

आता काही महिन्यानंतर आता कोरोना उपचाराचा पॅटर्न बऱ्यापैकी स्थिर झाल्याने मृत्युदरात घट होऊ लागली आहे. कोरोना टेस्टमुळे आजाराचे लवकर निदान व्हायला लागले आहे. तसेच आजाराची स्थितीचे निदान होताच नेमके रुग्णांला कोणत्या उपचाराची गरज याचे व्यवस्थापन देखील रुग्णालयाकडून होत आहे. आजाराच्या स्थितीनुसार उपचाराचे वर्गीकरण झाल्याने उपचाराचा वेग वाढला आहे. 
शहरातील अनेक भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले. त्यांच्यावर उपचार देखील केले गेले. मात्र सुरुवातीला आजाराचे स्वरुप माहिती नसल्याने रुग्णांमध्ये आजाराची धास्ती खुपच जास्त होती. या धास्तीमध्ये नकारात्मकता असल्याने डॉक्‍टंराना देखील उपचारासाठी लागणारा आत्मविश्‍वास मिळत नव्हता. मात्र आता रुग्णालयामधून बरे होऊन गेलेल्या रुग्णांनी त्यांचे नातेवाईक, शेजारी व मित्रांना त्यांचा उपचाराचा अनुभव शेअर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नवे रुग्ण येत असताना ते त्यांच्या नातेवाईक व मित्रांचा कोरोना मुक्तीचा अनुभव एैकूनच येत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेमध्ये मी बरा होणारच अशी सकारात्मक भावना वाढीस लागली आहे. एक तर ऍटिजेन टेस्ट झाल्याने लवकर निदान व आत्मविश्‍वासामुळे परिणामांची सकारात्मकता डॉक्‍टरांना आनंद देणारी ठरू लागली आहे. केवळ गुंतागुंतीचे रुग्ण सोडले तर इतर रुग्णांची बदललेली मानसिकता कोरोना आजाराच्या साथीमधला एक वेगळा टप्पा डॉक्‍टरांना अनुभवण्यास मिळू लागला आहे. 

मानसिकतेमध्ये मोठा बदल 
आतापर्यंत उपचार केलेल्या रुग्णांच्या मानसिकतेमध्ये सध्याची स्थिती खुपच चांगली आहे. रुग्ण हे पुर्वीच्या रुग्णांचा अनुभव समजुन घेतच दवाखान्यात येत आहेत. त्यांच्या मानसिकता चांगली मानली पाहिजे. 
- डॉ. निर्मलकुमार तापडीया, वैद्यकीय अधिकारी,आश्‍विनी रुग्णालय सोलापूर.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com