सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये 101 नवे कोरोनाबाधित; 10 जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 1057 (65), बार्शी- 5192 (167), करमाळा- 1994 (46), माढा- 2931 (95), माळशिरस- 4921 (95), मंगळवेढा- 1332 (31), मोहोळ- 1293 (69), उत्तर सोलापूर- 710 (32), पंढरपूर- 5698 (140), सांगोला- 2289 (32), दक्षिण सोलापूर- 1384 (41), एकूण- 28803 (813). 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 101 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज एकूण एक हजार 287 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 186 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 101 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज 240 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे. कोरोनामुळे आज सहा पुरुष आणि चार महिलांसह 10 जणांचा बळी गेला आहे. 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची बाधितांची संख्या आता 28 हजार 803 एवढी झाली आहे. कोरोनामुळे 813 जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये तीन हजार 821 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झाल्यामुळे 20 हजार 169 जणांना घरी सोडले आहे. 
आज टेंभुर्णी (ता. माढा) येथील 65 वर्षाची महिला, मेडशिंगी (ता. सांगोला) येथील 63 वर्षाचे पुरुष, साळुंखे प्लॉट अक्कलकोट येथील 45 वर्षाचे पुरुष, धायटी (ता. सांगोला) येथील 70 वर्षाची महिला, भोयरे (ता. मोहोळ) येथील 50 वर्षाचे पुरुष, टेंभुर्णी (ता. माढा) येथील 70 वर्षाची महिला, गजानन नगर पंढरपूर येथील 72 वर्षाचे पुरुष, बारंगुळे गल्ली कसबा पेठ बार्शी येथील 81 वर्षाचे पुरुष, केम (ता. करमाळा) येथील 60 वर्षाची महिला आणि ओझेवाडी (ता. पंढरपूर) येथील 63 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 101 new corona in rural Solapur; 10 killed