सोलापूरच्या ग्रामीण भागात 120 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 1059 (66), बार्शी- 5203 (167), करमाळा- 1999 (46), माढा- 2941 (96), माळशिरस- 4965 (96), मंगळवेढा- 1337 (31), मोहोळ- 1302 (71), उत्तर सोलापूर- 715 (32), पंढरपूर- 5716 (144), सांगोला 2302 (33), दक्षिण सोलापूर- 1384 (41), एकूण- 28923 (823).

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 120 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. आज एकूण एक हजार 399 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 279 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज पुन्हा एकदा 10 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. त्यामध्ये सहा पुरुष तर चार महिलांचा समावेश आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज झालेल्या अहवालानुसार बाधितांची संख्या आता 28 हजार 923 एवढी झाली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात आत्तापर्यंत 823 जणांचा बळी गेला आहे. वेगवेगळ्या रुग्णालयात अद्यापही कोरोनाग्रस्त असल्यामुळे तीन हजार 679 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झाल्यामुळे 24 हजार 421 जणांना आपापल्या घरी सोडले आहे. आजच्या अहवालानुसार एकलासपूर (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षांचे पुरुष, गादेगाव (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षाचे पुरुष, नेवरे (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाचे पुरुष, खिलारवाडी (ता. सांगोला) येथील 50 वर्षाची महिला, बेंबळे (ता. माढा) येथील 66 वर्षांची महिला, रोहिदास चौक पंढरपूर येथील 65 वषाचे पुरुष, गवत्या मारुती चौक मोहोळ येथील 65 वर्षाचे पुरुष, प्रदक्षिणा रोड पंढरपूर येथील 78 वर्षाची महिला, कोरवली (ता. मोहोळ) येथील 45 वर्षाचे पुरुष तर वागदरी (ता. अक्कलकोट) येथील 65 वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 दक्षिण सोलापुरात एकही रुग्ण नाही 
दक्षिण सोलापूर तालुक्‍यात कोरोनाच्या संसर्गाच्या सुरवातीच्या काळात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र, आता तेथील संख्या कमी झाली आहे. आजच्या अहवालात त्या तालुक्‍यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 120 new coronary artery disease patients in rural Solapur