मंगळवेढा तालुक्‍यात 138 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर 

pur.jpg
pur.jpg

मंगळवेढा(सोलापूर) ः हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशारामुळे तालुक्‍यात जनतेची अवस्था आधी सामना अतिवृष्टी लढण्याचा मग सामना कोरोनाशी लढण्याचा तालुक्‍यातील तांमदर्डी गावाला भीमा नदीच्या पुराचा वेढा दिल्याने या गावातील कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे काम महसूल प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले. रात्री आठ पर्यंत 28 कुटुंबातील 138 नागरिकांचे स्थलांतरीत केले. 

ता. 15 वा सकाळी 7 वाजेपर्यंत तालुक्‍यातील सात महसूल मंडळ मधील पर्जन्य मापकावर नोंदलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. मंगळवेढा 135, मरवडे 34, आंधळगाव 90, मारापूर 140, भोसे 58, बोराळे 74 हुलजंती 47 मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्‍यात पडलेल्या पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हुलजंती येथे माल वाहतूक करणारा आयशर टेम्पो पलटी झाला तर अकोला ते गुंजेगाव रस्त्यावर दुधाचा पिकअप पलटी झाला. त्यामध्ये 5 कॅनमधील 170 लि. दूध वाहून गेले. 

सोलापूरला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. तर सिद्धापूर ते वडापूर, मारापूर-घरनिकी, मंगळवेढा-खोमनाळ, मंगळवेढा-बोराळे, रहाटेवाडी-तामदर्डी, तामदर्डी-तांडोर, महमदाबाद (हु)-हुन्नुर, पाठखळ-मंगळवेढा, बावची सलगर बु., सलगर खु., लवंगी या गावाशी संपर्क तुटला. नागपूर रत्नागिरी या महामार्गाच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय कामगाराच्या निवासस्थानी पाणी शिरल्यामुळे त्या मजुरांना आसय्रासाठी संघर्ष करावा लागला. नगरपालिकेच्या व्यापारी गाळ्यात शिरलेले पाणी प्रशासनाने मोटर लावून काढले. परंतु सायंकाळच्या सत्रात पुन्हा हे पाणी त्या गाळ्यात येण्यास सुरुवात झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
महसूल प्रशासनाने गाव व कंसातील कुटूंब संख्या स्थलांतरित केली. लोकसंख्या मुढवी 2(11), बठाण 6(22), ब्रह्मपुरी 2(11),उचेठाण 11(57), माचणुर 2(8) घरनिकी 1(3), तामदर्डी 3(17) रहाटेवाडी 1(20). 

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी 
बाधित नागरिकांच्या कुटुंबांचे स्थलांतरित करण्याचे काम सुरूच आहे पावसाच्या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी राहावे. अडचण आल्यास तातडीने प्रशासनाची संपर्क साधावा. 
- स्वप्निल रावडे तहसीलदार

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com