संपर्कातील 14 व्यक्‍ती पॉझिटिव्ह ! आज 34 जण बाधित; भवानी पेठेतील 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

तात्या लांडगे
Sunday, 18 October 2020

ठळक बाबी...

  • शहरातील 87 हजार 803 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात नऊ हजार 258 जणांना झाला कोरोना
  • शहरातील आठ हजार 71 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • आतापर्यंत शहरातील 513 रुग्णांचा झाला कोरोनामुळे मृत्यू
  • आज 320 संशयितांची टेस्ट; त्यात 34 पॉझिटिव्ह अन्‌ एका पुरुषाचा बळी

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. मात्र, आता कोरोना रुग्णाच्या संपर्कातून कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज (रविवारी) 320 संशयितांची टेस्ट करण्यात आली असून त्यात 34 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये रुग्णांच्या संपर्कातून 14 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यात अंत्रोळीकर नगरात दोन, वानकर वस्ती परिसरात (देगाव) तीन, निलम नगरात चार, निराळे वस्ती परिसर, करंजकर सोसायटी (शेळगी) येथे प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

ठळक बाबी...

  • शहरातील 87 हजार 803 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात नऊ हजार 258 जणांना झाला कोरोना
  • शहरातील आठ हजार 71 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • आतापर्यंत शहरातील 513 रुग्णांचा झाला कोरोनामुळे मृत्यू
  • आज 320 संशयितांची टेस्ट; त्यात 34 पॉझिटिव्ह अन्‌ एका पुरुषाचा बळी

 

शहरात आज रंगराज नगर, लिमयेवाडी, विशाल नगर (जुळे सोलापूर), माणिक चौक (शुक्रवार पेठ), अंत्रोळीकर नगर, वानकर वस्ती (देगाव), उमा नगरी (मुरारजी पेठ), निला नगर, रुपाभवानी रोड, रेल्वे लाईन्स, कर्णिक नगर, अभिषेक नगर (जुना पुना नाका), वसंत विहार भाग- तीन, आसरा चौक, लक्ष्मी नगर (बाळे), अमर नगर (बसवेश्‍वर नगर), स्वामी विवेकानंद नगर, प्रियदर्शनी नगर (जुना विडी घरकूल), निलम नगर, दमाणी नगर, करंजकर सोसायटी (शेळगी), आदित्य अपार्टमेंट (लष्कर), शाहीर वस्ती येथे नवे रुग्ण सापडले आहेत. तर भवानी पेठ परिसरातील वर्धमान नगरातील 64 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरातील 94 संशयित होम क्‍वारंटाईन असून 103 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 contact persons positive! Today 34 people were affected; 64-year-old man dies in Bhavani Peth