सोलापूर ग्रामीणमध्ये 191 कोरोनाबाधित, चौघांचा मृत्यू 

प्रमोद बोडके
Sunday, 22 November 2020

तालुकानिहाय बाधीत. कंसात मृत्यू संख्या 
अक्कलकोट : 1150 (69), बार्शी : 6180 (182), करमाळा : 2122 (51), माढा : 3563 (114), माळशिरस : 6126 (128), मंगळवेढा : 1548 (45), मोहोळ : 1693 (84), उत्तर सोलापूर : 760 (36), पंढरपूर : 6921 (208), सांगोला : 2661 (44), दक्षिण सोलापूर : 1499 (50), एकूण : 34223 (1011) 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे सहा हजार 730 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील सहा हजार 539 अहवाल निगेटिव्ह आले असून 191 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 112 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोना चाचणीचे 54 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 34 हजार 223 झाली आहे. त्यातील 31 हजार 753 जण कोरोना मुक्त झाले आहेत. रुग्णालयात अद्यापही 1 हजार 459 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना मुळे आत्तापर्यंत एक हजार अकरा जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरस तालुक्‍यातील नातेपुते येथील 75 वर्षिय पुरुष, पंढरपूर येथील लक्ष्मी टाकळी येथील 61 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील शिंदेवाडी येथील 83 वर्षिय पुरुष आणि बार्शी तालुक्‍यातील पिंपळगाव येथील 71 वर्षिय पुरुषाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अकरा हजार 639 जण सध्या होम क्वारंटाईनमध्ये असून 2 हजार 378 जण इन्स्टिट्युन्शनल क्वारंटाईनमध्ये आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 191 coronated in Solapur rural, four killed