सोलापूर ग्रामीणमध्ये 193 कोरोना बाधित, चौघांचा मृत्यू 

प्रमोद बोडके
Thursday, 26 November 2020

तालुकानिहाय बाधित. कंसात मृत्यू संख्या 
अक्कलकोट : 1151 (69), बार्शी : 6237 (185), करमाळा : 2138 (51), माढा : 3663 (115), माळशिरस : 6310 (131), मंगळवेढा : 1587 (46), मोहोळ : 1728 (85), उत्तर सोलापूर : 778 (37), पंढरपूर : 7136 (211), सांगोला : 2720 (45), दक्षिण सोलापूर : 1511 (51), एकूण : 34959 (1026) 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 3 हजार 162 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 969 अहवाल निगेटिव्ह आले असून 193 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंदही आजच्या अहवालात घेण्यात आली आहे. आज एका दिवशी 86 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोना चाचणीचे 58 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. सोलापूरच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 34 हजार 959 झाली आहे. कोरोना मुळे आतापर्यंत एक हजार 26 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 763 जणांवर उपचार सुरू आहेत.

ग्रामीण भागातील 32 हजार 170 जण आत्तापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पंढरपूर तालुक्‍यातील सुपली येथील 65 वर्षिय पुरुष, बार्शी तालुक्‍यातील घाणेगाव येथील 63 वर्षिय पुरुष, बार्शी तालुक्‍यातील मानेगाव येथील 65 वर्षिय महिला आणि माळशिरस तालुक्‍यातील जांभूड येथील 56 वर्षिय पुरुषाचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 193 corona infested in rural Solapur, killing four