esakal | सोलापूरच्या ग्रामीण भागात 209 नवे कोरोना बाधित, आठ जणांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

पंढरपूरमध्ये आजही सर्वाधिक रुग्ण 
गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर शहर व तालुक्‍यात बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज प्राप्त झालेल्या 209 कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक 69 रुग्ण पंढरपूर तालुक्‍यातील आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातील 8, बार्शीतील 11, करमाळ्यातील आठ, माढ्यातील 10, माळशिरसमधील 23, मंगळवेढ्यातील सात, मोहोळमधील नऊ, उत्तर सोलापूरमधील 15, सांगोल्यातील तीस व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 19 कोरोनाबाधितांचा समावेश आहे. मृत पावलेल्या आठ व्यक्तींमध्ये बार्शी तालुक्‍यातील तीन, माळशिरस तालुक्‍यातील दोन, सांगोला, उत्तर सोलापूर व अक्कलकोट या तालुक्‍यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. 

सोलापूरच्या ग्रामीण भागात 209 नवे कोरोना बाधित, आठ जणांचा मृत्यू 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या हद्दीत आज नव्या 209 कोरोना बाधितांची भर पडली असून आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. 84 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये अक्कलकोट तालुक्‍यातील हत्तीकणबस, कर्जाळ, कुरनूर, करमाळा तालुक्‍यातील भगतवाडी, दहिगाव, पिंपळवाडी, वीट, माढा तालुक्‍यातील कुर्डू, म्हैसगाव, मानेगाव माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोरगाव, कन्हेर, माळीनगर, मांडवे, पठाण वस्ती, संगम, संग्रामनगर, शिंदेवाडी, श्रीपूर, वेळापूरचा समावेश आहे. मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव, आरळी, शिरनांदगी, पंढरपूर तालुक्‍यातील भंडीशेगाव, भोसे, एकलासपूर, करकंब, कासेगाव, खेड भाळवणी, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, लोणारवाडी, ओझेवाडी, रोपळे, शिरगाव सुस्ते, वाखरी येथील रुग्णांचा समावेश आहे. 

बार्शी तालुक्‍यातील दडशिंगे, जामगाव, खामगाव, कोरफळे, पांगरी, सौंदरे, उंबरगे, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील अकोले मंद्रूप, औज मंद्रूप, बरुर, हत्तुर, होटगी स्टेशन, कुंभारी, मुस्ती, वळसंग तांडा, वळसंग, सांगोला तालुक्‍यातील बामणी, चिकमहूद, एकतपुर, गोडवाडी, जवळा, खवसापूर, महूद, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अकोलेकाटी, गावडी दारफळ, कोंडी, वडाळा, मोहोळ तालुक्‍यातील कुरुल व यावली येथील बाधित यांचा समावेश आहे. 

कोरोनामुळे वैराग मधील 78 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्‍यातील गाडेगाव येथील पन्नास वर्षिय पुरुष, बार्शी तालुक्‍यातील साकत येथील 61 वर्षिय पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील मार्डी येथील 62 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्‍यातील बोरगाव येथील 65 वर्षीय महिला, माळीनगर येथील 58 वर्षीय पुरुष, सांगोला तालुक्‍यातील चिकमहूद येथील 45 वर्षिय पुरुष, अक्कलकोट तालुक्‍यातील चपळगाव येथील 65 वर्षिय पुरुष या आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.