विठ्ठलराव शिंदे कारखाना निवडणूक बिनविरोध जाहीर

संतोष पाटील 
Monday, 22 February 2021

या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी 21 जागांसाठी 21 अर्ज आल्याने सर्वांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले. 

टेंभुर्णी (सोलापूर) : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालकांची बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी सर्वसाधारण सभेत जाहीर केले.

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा 2002 चे नियम 19 अन्वये संचालक मंडळ निवड घोषित करण्यासाठी रविवार (ता. 21) रोजी सकाळी विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना स्थळावर सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी 21 जागांसाठी 21 अर्ज आल्याने सर्वांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले. 

मी बारामतीचा नाद सोडला नाही : जानकर 

आमदार बबनराव शिंदे, रमेश येवले-पाटील, वामनराव उबाळे, सुरेश बागल, पोपट गायकवाड, अमोल चव्हाण, नीळकंठ पाटील, शिवाजी डोके, लक्ष्मण खुपसे, विष्णू हुंबे, प्रभाकर कुटे, भाऊराव तरंगे, रणजितसिंह शिंदे, लाला मोरे, वेताळ जाधव, सचिन देशमुख, विक्रमसिंह शिंदे, पांडुरंग घाडगे, पोपट चव्हाण, सिंधुताई नागटिळक, संदीप भुजंगराव पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. 

महानाट्याची आणखी काही दिवस प्रतीक्षा : अभिजित पाटील

यावेळी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संस्थापक आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, साखर कारखान्याचे सभासद शेतकरी व संचालक मंडळाच्या सहकार्याने अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 2500 मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टन, डिस्टलरी प्रकल्प क्षमता 30 केएलपीडी वरून 150 केएलपीडी, को जनरेशन प्रकल्प क्षमता 7.5 मेगावॉटवरून 38 मेगावॉट, 250 मेट्रिक टन रिफाईन शुगर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केले आहेत.

भाडेकरूने केली एक फ्लॅट अन्‌ वीस लाखांची मागणी

जिल्हा बॅंकेकडून सरफेसी ऍक्‍ट 2002 अंतर्गत युनिट नंबर दोन करकंब हा 2500 मेट्रिक टन क्षमता व 12.5 मेगावॉट को जनरेशन प्रकल्प असणारा साखर कारखाना खरेदी केला असून 2019-20 पासून यशस्वीरित्या कार्यान्वित झालेला आहे. आतापर्यंत साखर कारखान्याच्या युनिट नंबर एक पिंपळनेरमध्ये 13 लाख 52 हजार तर युनिट नंबर दोन करकंबमध्ये 3 लाख 71 हजार मेट्रिक टन ऊसाचे गळीत झाले असून दोन्ही युनिटमध्ये 31 जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाचे सुमारे 252 कोटी रुपये बील शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड का ई-सकाळचे ऍप 

गळीत हंगामामध्ये माढा तालुका व मतदारसंघातील सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप करणार आहे. कारखान्याने 3 कोटी 70 लाख लिटर इथेनॉल पुरवठा करण्याचा तेल कंपन्यांबरोबर करार केला असून आतापर्यंत त्यापैकी 50 लाख लिटर इथेनॉल पुरवठा केला आहे. 3 लाख 70 हजार क्विंटल साखर निर्यातीचा कोटा निश्‍चित झाला असून जुनी व नवी साखर निर्यात करून 50 टक्के कोटा पूर्ण केला आहे. केंद्र सरकारकडून गेल्या वर्षाचे 42 कोटी व चालू वर्षाचे 22 कोटी रुपये निर्यात अनुदान येणे आहे, असेही ते म्हणाले. 

यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी आबासाहेब गावडे, कारखान्याचे सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रभारी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी मानले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 directors of Vitthalrao Shinde Co operative Sugar Factory have been elected unopposed