सोलापूरच्या ग्रामीणमध्ये आज आढळले 214 कोरोना बाधित 

संतोष सिरसट 
Friday, 28 August 2020

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 214 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज एकूण दोन हजार 213 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी एक हजार 999 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 214 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या जरी कमी होत असली तरी मृतांची संख्या मात्र वाढतच आहे. आज पुन्हा नऊ जणांचा बळी कोरोनाने घेतल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत कोरोनाने बाधित झालेल्यांची संख्या ग्रामीण भागांमध्ये दहा हजार 616 इतकी झाली आहे. याशिवाय कोरोनाने 308 जणांचा बळी घेतला आहे. अद्यापही रुग्णालयात दोन हजार 836 हजार जण उपचार घेत आहेत. तर बरे होऊन एक हजार 472 जण घरी सुखरुप पोचले आहेत. 

आज बार्शी तालुक्‍यातील शेळगाव येथील 73 वर्षाचे पुरुष, धामणगाव येथील 90 वर्षाची महिला, माळी गल्ली येथील 75 वर्षाचे पुरुष, अलिपूर रोड येथील 85 वर्षाचे पुरुष, कापसे बोळ येथील 58 वर्षाची महिला, अक्कलकोट तालुक्‍यातील धानोरा येथील 48 वर्षाची महिला, पंढरपुरातील संभाजी चौकातील 50 वर्षाच पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज येथे राहणारे 53 वर्षाचे पुरुष, माळीनगर मधील 62 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

या गावात आढळले नवे कोरोनाबाधित 
अक्कलकोट मधील समर्थ नगर, दुधनी, वेताळ चौक, बार्शीतील आडवा रस्ता, अलीपूर रोड, बावी, छत्रपती कॉलनी, दत्त बोळ, देशमुख प्लॉट, गाडेगाव रोड, गवळे गल्ली, घारी, घोडके प्लॉट, कदम वस्ती, कासारवाडी रोड, कव्हे, खाजानगर, कुर्डूवाडी रोड, लक्षाचीवाडी, मंगळवार पेठ, नागणे प्लॉट, नळे प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटल जवळ, पानगाव, पाटील प्लॉट, राऊळ गल्ली, सौंदरे, सोलापूर रोड, सोमवार पेठ, सुभाष नगर, वैदुवाडी, वैराग, करमाळा तालुक्‍यातील बहात्तर बंगला, दत्त पेठ, हिरडे प्लॉट, कविटगाव, केम, लव्हे, मेन रोड करमाळा, एमायडीसी करमाळा, निलज, राशिन पेठ, शिवाजीनगर, झरे, माढा तालुक्‍यातील कुर्डूवाडी, म्हैसगाव, मोडनिंब, टेंभुर्णी, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोरगाव, डोंबळवाडी, कण्हेर, खंडाळी, कोंडबावी, माळीनगर, मोरोची, संग्राम नगर, यशवंत नगर, मंगळवेढ्यातील नाव्ही गल्ली, संत चोखामेळा नगर, सप्तशृंगी नगर, तुकाई नगर, मोहोळ तालुक्‍यातील अनगर, बेगमपूर, दत्तनगर, एकुरके, साठेनगर, येवती, पंढरपुरातील आंबेडकर नगर, अवे, नगरपालिका हॉस्पिटलच्यामागे, चंद्रमा रेसिडेन्सी, डाळे गल्ली, ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी, डोंबे गल्ली, गाताडे प्लॉट, गोकुळ नगर, गुरसाळे, इंदिरा गांधी भाजी मार्केट, ईश्वर वठार, कडबे गल्ली, कालिका देवी चौक, खरसोळी, कुंभारघाट, लिंक रोड, नागपूरकरमठ, नांदोरे, नाथ चौक, नवी पेठ, ओमकार नगर, पद्मावती, रोहिदास चौक, संतपेठ, स्टेशन रोड, तुंगत, उत्पात गल्ली, वाखरी, वांगीकर नगर, झेंडे गल्ली, सांगोल्यातील चिंचोली रोड, चिंचोली, नाझरे, परीट गल्ली, शिवाजीनगर, उडानवाडी, दक्षिण सोलापुरातील विडी घरकुल, आयबीएम कंपनी मंद्रूप, विंचूर या गावांमध्ये नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 214 corona infected found today in rural Solapur