
मंगळवेढा (जि. सोलापूर) : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत मंगळवेढा तालुक्यातील 3 हजार 763 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तर 323 शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र ठरले आहेत. आतापर्यंत 2 हजार 774 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घेतले आहे.
मंगळवेढा तालुक्यात कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तालुक्यातील जवळपास 80 गावातील शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकाकडून कर्ज घेतलेले होते. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अखत्यारीत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना कर्जवाटप झाले आहे. एकूण 4 हजार 611 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यातील 323 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले. एकूण 989 शेतकरी आधार प्रमाणिकरणाअभावी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. 59 शेतकऱ्यांच्या बोटाचे ठसे जुळत नसल्याबाबत त्यांनी तालुका निवारण समितीकडे तक्रारी अर्ज दाखल केले. दरम्यान, काही ठिकाणी पोर्टलवर आधार प्रमाणिकरण करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या. तेव्हा कर्जदार शेतकऱ्यांनी शेजारच्या गावात जाऊन बोटाचे ठसे प्रमाणित करुन घेतले.
हेही वाचा - धनदांडग्यांपासून वाचवा 'झेडपी'च्या जागा
या योजनेतील गावनिहाय शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : माचणूर 40, मंगळवेढा 137, ब्रह्मपुरी 122, ढवळस 12, आंधळगाव 49, जंगलगी 36, गणेश वाडी 40, गुंजेगाव 108, घरनिकी भालेवाडी 42, डोनज 50, जित्ती 57, फटेवाडी 36, धर्मगाव 52, आसबेवाडी 32, जालीहाळ 36, देगाव 11, अकोला 64, हिवरगाव 17, हुन्नुर 66, डोंगरगाव 64, बावची 4, चिक्कलगी 44, हजापूर 43, बोराळे 83, हुलजंती 51, आरळी 90, गोणेवाडी 43, भोसे 130, रेवेवाडी 12, येड्राव 16, तामदर्डी 39, सोड्डी 24, तळसंगी 78, सिद्धनकेरी 1, शिरनांदगी 38, सिद्धापूर 103, शिवणगी 14, शिरसी 12, दामाजी नगर 1, शेलेवाडी 26, सलगर बुद्रुक 92, सलगर खुर्द 27, नंदूर 56, रहाटेवाडी 32, रड्डे 96, पौट 45, पडोळकरवाडी 86, कात्राळ 6, पाठखळ 30, निंबोणी 41, मुंडेवाडी 22, नंदेश्वर 100, मरवडे 149, मारापूर 32,मारोळी 38, मुढवी 41, मानेवाडी 8, माळेवाडी 4, मल्लेवाडी 12, महमदाबाद शे.44, महमदाबाद हु. 36, लेंडवेचिंचाळे 32, लोणार 83, लक्ष्मी दहिवडी 99, लवंगी 19, लमाण तांडा 2, खुपसंगी 29, खोमनाळ 70, खवे 3, खडकी 37, कर्जाळ 15, कागस्ट 7, कचरेवाडी 49, जुनोनी 2, भाळवणी 41 शेतकरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.