सोलापूर महापालिका हद्दीत 38 नवे कोरोना बाधित 

प्रमोद बोडके
Sunday, 22 November 2020

महापालिका हद्दीतील 107 जण अद्यापही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 72 जणांना इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन करण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील कोरोना चाचणीचे 226 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. महापालिका हद्दीतील एक लाख 14 हजार 160 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील एक लाख तीन हजार 788 अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत. 

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 1 हजार 18 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 980 अहवाल निगेटिव्ह आले असून 38 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालांमध्ये एकाही मृत व्यक्तीची नोंद नाही. आज एकाच दिवशी 19 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

महापालिका हद्दीतील एकूण बाधित व्यक्तींची संख्या आता 10 हजार 146 झाली आहे. महापालिका हद्दीतील 557 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 513 बाधितांवरती उपचार सुरू आहेत. आतापर्यंय नऊ हजार 76 जण कोरोना मुक्त झाले आहेत. आजच्या अहवालांमध्ये कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये जुळे सोलापुरातील रेणुका नगर, इंचगिरी मठा जवळील कुबेर चेंबर जवळ, रेल्वे लाइन्स परिसरातील टीव्हीएस शोरूमच्या मागे, विजापूर रोडवरील निर्मिती विहार, रंगभवन येथील विश्राम हौसिंग सोसायटी, हत्तुरे वस्ती येथील स्वामी विवेकानंद नगर, इरण्णा वस्ती, गैबीपीर नगर, निराळे वस्ती, इंदिरा नगर, विजापूर रोडवरील बेन्नूर नगर, बुधवार पेठेतील मनपा कॉलनी, टिळक चौक, रविवार पेठेतील राज बिल्डिंग, मुरारजी पेठ, उद्धव नगर, जुळे सोलापूर परिसरातील दावत हॉटेल जवळ, कुंभार वेस, विजापूर रोडवरील सिंधू विहार, विजापूर रोडवरील मिलत नगर, व्यंकटेश हौसिंग सोसायटी, गुरुवार पेठ, मोदी, बाळे येथील वाणी गल्ली, गोविंद श्री मंगल कार्यालय जवळील शिवगंगा नगर, बुधवार पेठेतील निर्मला अपार्टमेंट, न्यु पाच्छा पेठेतील मयूर विहार, कोटणीस नगर, मुरारजी पेठेतील वारद चाळ, अवंती नगर, भवानी पेठेतील हनुमान नगर या परिसरातील व्यक्तींचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 38 new corona affected in Solapur municipal area