शहरात आज 40 पॉझिटिव्ह ! दोघांचा मृत्यू; टेस्टची संख्या जैसे थे 

तात्या लांडगे
Friday, 18 September 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 74 हजार 544 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत 66 हजार 788 संशयितांची टेस्ट निगेटिव्ह 
  • आज 502 अहवालात 40 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 
  • 67 वर्षांवरील दोन पुरुषांचा आज कोरोनामुळे झाला मृत्यू 
  • शहरातील एकूण रुग्णसंख्या सात हजार 756 तर 452 जणांचे झाले मृत्यू 

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या अद्यापही कमी झालेली नसून एक-दोन दिवसाआड मृत्यू होतच आहेत. ठरावीक परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळत असतानाही त्या परिसरातील संशयितांची टेस्टिंग वाढलेली नाही. मागील काही दिवसांत दररोज सरासरी साडेचारशे ते पाचशे संशयितांचीच टेस्ट केली जात आहे. आज (शुक्रवारी) शहरात 40 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर जुळे सोलापुरातील रुबी नगरातील 67 वर्षीय पुरुष आणि मुरारजी पेठेतील (निराळे वस्ती) 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. 

रेल्वे लाईन्स (कोनापुरे चाळ), मंगळवार पेठ (टिळक चौक), उत्तर कसबा, संतोष नगर (बाळे), महालक्ष्मी नगर, सैफूल, मंत्री चंडक रेसिडेन्सी (विजयपूर रोड), जयजलराम नगर, म्हाडा कॉलनी (जुळे सोलापूर), पद्मनगर, दक्षिण कसबा, मोदीखाना, सुशिल नगर, शेळगी, आसरा चौक, पाथरुट चौक, वानकर वस्ती (देगाव), भारत नगर (कुमठा नाका), अंत्रोळीकर नगर, जयकुमार नगर (सैफूल), जवाहर वस्ती (बुधवार पेठ), उमानगरी (मुरारजी पेठ) आणि जुळे सोलापुरातील वसंत नगर येथे आज नव्या रुग्णांची भर पडली आहे.

 

लोकसंख्येच्या तुलनेत दहा टक्‍केही टेस्टिंग नाही 
शहराची लोकसंख्या 13 लाखांपर्यंत असून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढत आहे. दुसरीकडे शहरातील टेस्टिंगची संख्या म्हणावी तितकी वाढलेली नाही. एकूण लोकसंख्येच्या दहा टक्‍केही टेस्टिंग झालेले नाही. रॅपिड ऍन्टीजेन टेस्टची संख्या आतापर्यंत 46 हजारांपर्यंत पोहचली आहे. त्यात एकाच व्यक्‍तीने दोनदा टेस्ट केलेल्यांचाही समावेश आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्याच्या हेतूने टेस्टिंगवर भर देण्याची गरज व्यक्‍त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 positives in the solapur city today and Death of both; Test numbers were like