उपचारासाठी उशिरा दाखल झालेल्या 40 वर्षीय पुरुषाचा मृत्यू ! शहरात आज 25 पॉझिटिव्ह तर चौघांचा बळी

तात्या लांडगे
Wednesday, 28 October 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 91 हजार 427 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 485 कोरोना पॉझिटिव्ह 
  • सत्तर फूट रोड (अशोक चौक) परिसरातील 67 वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • शहरात 664 अहवालात 25 जण पॉझिटिव्ह तर चौघांचा झाला मृत्यू 

 सोलापूर : अशोक चौक, सत्तर फूट रोड परिसरातील 67 वर्षीय महिला उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात 20 ऑक्‍टोबरला दाखल झाली. 24 ऑक्‍टोबरला तिथून डिस्चार्ज घेऊन यशोधरा रुग्णालयात दाखल झाली. त्या महिलेचा 27 ऑक्‍टोबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 27 ऑक्‍टोबरला सर्वोपचार रुग्णालयात दाखल पुरुषाचा त्याच दिवशी मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या अहवालात आहे. आज शहरात 25 नव्या रुग्णांची भर पडली असून मृत्यूची संख्या चारने वाढली आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील 91 हजार 427 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 485 कोरोना पॉझिटिव्ह 
  • सत्तर फूट रोड (अशोक चौक) परिसरातील 67 वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • शहरात 664 अहवालात 25 जण पॉझिटिव्ह तर चौघांचा झाला मृत्यू 

 

शहरात आज सुशिल नगर (भारती विद्यापीठजवळ), विडी घरकूल, हब्बू वस्ती (देगाव नाका), सर्वोदय नगर (होटगी रोड), अशोक नगर, मदनी नगर (विजयपूर रोड), मुबिना कॉम्प्लेक्‍स (रेल्वे लाईन्स), गर्व्हनमेंट पॉलिटेक्‍निक कॉलनीजवळ, नव समता नगर (चाकोते नगर, शेळगी), गरिबी हटाव झोपडपट्टी, लाभेष रेसिडेन्सी, दक्षिण कसबा (टिळक चौक), अशोक चौक, मन्मित हाउसजवळ (जुळे सोलापूर), राघवेंद्र नगर (मजरेवाडी), रेणुका नगर (सैफूल), अंबिका नगर, वर्धमान नगर (रुपाभवानी मंदिराजवळ) आणि अंवती नगर येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरातील 106 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये असून अवघे 56 संशयित होम आयसोलशेन व इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. वर्धमान नगरातील (भवानी पेठ) 67 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय अनोळखी व्यक्‍ती आणि हब्बू वस्ती (देगाव नाका) येथील 40 वर्षीय पुरुषाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40-year-old man dies after late treatment In the solapur city today, 25 were positive and four were victims