शहरात आज 48 पॉझिटिव्ह ! सहा हजार 951 रुग्णांची कोरोनावर मात

तात्या लांडगे
Sunday, 27 September 2020

ठळक बाबी...

  • शहरातील 78 हजार 790 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरातील 70 हजार 491 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह
  • आज 395 संशयितांमध्ये आढळले 48 पॉझिटिव्ह; एकाचाही मृत्यू नाही
  • आतापर्यंत आठ हजार 299 रुग्णांपैकी सहा हजार 951 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • शहरात सद्यस्थितीत 83 होम क्‍वारंटाईन तर 59 व्यक्‍ती आहेत इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन

सोलापूर : शहरात शिक्षक- शिक्षिका, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत को- मॉर्बिड व्यक्‍तींचा सर्व्हे करण्यात येत आहे. सुमारे तीनशे व्यक्‍तींची त्यासाठी नियुक्‍ती करण्यात आलेली असतानाही दररोज चारशे ते साडेचारशे संशयितांचीच कोरोना टेस्ट केली जात आहे. आज 395 संशयितांचीच टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये 48 व्यक्‍तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ओल आहेत. सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 881 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ठळक बाबी...

  • शहरातील 78 हजार 790 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरातील 70 हजार 491 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह
  • आज 395 संशयितांमध्ये आढळले 48 पॉझिटिव्ह; एकाचाही मृत्यू नाही
  • आतापर्यंत आठ हजार 299 रुग्णांपैकी सहा हजार 951 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • शहरात सद्यस्थितीत 83 होम क्‍वारंटाईन तर 59 व्यक्‍ती आहेत इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन

व्ही.जी.जी.एम.सी बॉईज हॉस्टेल, उत्तर कसबा, भवानी पेठ, न्यू पाच्छा पेठ, विनायक नगर, उध्दव नगर, सिंधू विहार, मंत्री चंडक पार्क, राजस्व नगर, (विजयपूर रोड), स्वामी विवेकानंद नगर, चंडक विहार, रोहिणी नगर (सैफूल), अश्‍वगंधा अपार्टमेंट (दावत चौक), सिध्देश्‍वर पेठ, आसरा सोसायटी, भारतमाता नगर (होटगी रोड), व्यंकटेश नगर- दोन, एकता नगर, गुरुवार पेठ, संगम नगर (विडी घरकूल), आदर्श नगर, विद्या नगर (शेळगी), अंबिका नगर (पारशी विहिरीजवळ), तक्षशिला नगर, विणकर वस्ती (एमआयडीसी), रेल्वे लाईन्स, एसआरपी कॅम्प, राधाकृष्ण अपार्टमेंट, राघवेंद्र नगर (मजरेवाडी), दक्षिण कसबा आणि बुधवार पेठ याठिकाणी रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत शहरातील 28 हजार 259 संशयितांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले होते. सद्यस्थितीत 83 संशयित होम क्‍वारंटाईन असून दुसरीकडे 13 हजार 846 संशयितांपैकी 12 हजार 54 व्यक्‍तींनी 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 48 positives in the city today! Six thousand 951 patients overcome corona