सोलापूरच्या ग्रामीण भागात 519 कोरोनाबाधित 

संतोष सिरसट 
Monday, 14 September 2020

तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 796 (50), बार्शी- 3445 (126) करमाळा- 1249 (28), माढा- 1728 (54), माळशिरस- 2436 (52), मंगळवेढा- 849 (15), उत्तर सोलापूर- 595 (25), पंढरपूर- 3703 (84), सांगोला- 1103 (13), दक्षिण सोलापूर- 1149 (24), एकूण- 17858 (504). 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज एकूण दोन हजार 692 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन हजार 173 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 519 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर आज 374 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज आलेल्या अहवालानुसार ग्रामीण भागामध्ये दहा जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. 

दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने एकूण बाधितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज 519 रुग्ण नव्याने आढळल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या 17 हजार 658 एवढी झाली आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही दररोज दहाच्या पुढे असल्याने तो आकडा हे पाचशे पार होऊन 504 एवढा झाला आहे. कोरोनामुळे अद्यापही सहा हजार 41 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर आतापर्यंत 11 हजार 313 जणांना रुग्णालयातून कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे. 

आज ठोंबरे दहिगाव (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाची महिला, माढ्यातील 67 वर्षाचे पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 28 वर्षाची महिला, मार्केट यार्ड जवळ सांगोला येथील 70 वर्षाची महिला, वाखरी (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाचे पुरुष, कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील 65 वर्षाचे पुरुष, उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील 61 वर्षाचे पुरुष, संजय नगर अक्कलकोट येथील 54 वर्षाचे पुरुष, अलीपूर रोड बार्शी येथील 66 वर्षाची महिला तर गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षाच्या महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 519 coronated in rural areas of Solapur