सोलापूर शहरात 54 नवे कोरोना बाधित, पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू 

प्रमोद बोडके
Thursday, 1 October 2020

पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू 
आजच्या अहवालानूसार सोलापूर शहरातील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये पूर्व मंगळवार पेठ परिसरातील पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. हा मुलगा जन्मापासून मतिमंद होता. त्याला पक्षाघाताचाही विकार होता. एक महिन्यापासून या मुलांना श्वास घेण्याचा त्रास येत होत होता. त्रास वाढल्याने 23 सप्टेंबर रोजी स्पॅन पेडियाट्रिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 25 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. 27 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाले. मयत झालेली दुसरी व्यक्ती मुरारजी पेठ परिसरातील एकोणीसशे 59 वर्षिय पुरुष असून 1 सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास वळसंगकर हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. 30 सप्टेंबर रोजी रात्री पावणे एक वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 580 कोरोना चाचणी अहवालापैकी 526 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 54 अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आजच्या एकाच दिवशी 33 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

सोलापूर महापालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 8 हजार 519 झाली आहे. आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये मुरारजी पेठ येथील अभिमान श्री कॉम्प्लेक्‍स, हैदराबाद रोड वरील विडी घरकुल, आसरा चौक, विजापूर रोड वरील राणाप्रताप सोसायटी येथील राघवेंद्र नगर, विजापूर रोडवरील विद्या नगर, जुळे सोलापूर आसरा चौक, रेल्वे लाइन्स, अक्कलकोट रोडवरील झोपडपट्टी नंबर 3, अशियाना नगर इंदिरा नगर, वसंत विहार, अरविंद धाम पोलीस वसाहत, अभिमानश्री नगर, उत्तर कसबा, जुळे सोलापुरातील दत्तनगर, मजरेवाडी, काळी मशिदीजवळ, जोडभावी पेठ, मजरेवाडी, गोविंदश्री मंगल कार्यालय जवळ, विजापूर रोडवरील अंबिकानगर, पश्‍चिम मंगळवार पेठ, न्यू पाच्छा पेठ, सिव्हिल हॉस्पिटल जवळ, सैफूल परिसरातील सवेरा नगर, कुमठा नाका अंत्रोळीकर नगर येथील यशवंत सोसायटी, सैफूल येथील राणाप्रताप हाउसिंग सोसायटी, नई जिंदगी येथील शिवगंगा नगर, मल्हार अपार्टमेंट, कुमठे गाव, आराधना आपार्टमेंट बंजारा सोसायटी, आसरा येथील गजानन अपार्टमेंट, मोहिते नगर, मजरेवाडी, श्रमजिवी नगर येथील नीलम नगर, पत्रकार भवन जवळ, जुळे सोलापूर, जुळे सोलापूर कोणार्क नगर, इंद्रधनू अपार्टमेंट, भद्रावती पेठ, मंगळवार पेठ, क्षेत्रीय गल्ली, राजेंद्र चौक, गांधीनगर लष्कर, हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक नगर या भागात नव्याने रुग्ण आढळले आहेत. सोलापुरातील 479 जणांचा आत्तापर्यंत कोरोना मुळे मृत्यू झाला असून रुग्णालयात सध्या 910 जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 7 हजार 130 कोरोना मुक्त झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 54 new corona infected in Solapur city, a five-year-old boy deth