ब्रेकिंग ! सोलापुरात शनिवारी सापडले 57 रुग्ण; चौघांचा मृत्यू 

तात्या लांडगे
शनिवार, 27 जून 2020

शनिवारी येथे सापडले नवे रुग्ण 
बुधले गल्ली, बाळीवेस, दक्षिण कसबा, गंभीरे मंगल कार्यालयाजवळ, आसरा सोसायटी, दत्त नगर, जुळे सोलापूर, नंदिनगर, विजयपूर रोड, भवानी पेठ, दक्षिण सदर बझार, किसान नगर, अक्‍कलकोट रोड, सागर चौक, विडी घरकूल, शिवगंगा नगर, शेळगी, रुबी नगर, जुळे सोलापूर, एकता नगर, शाहीर वस्ती, भवानी पेठ, विद्याविहार, रेल्वे लाईन, अशोक नगर, विजयपूर रोड, हब्बु वस्ती, देगाव नाका, पद्मानगर, पाच्छा पेठ, अंबाबाइ मंदिरामागे, रामवाडी, विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, गीता नगर, एमआयडीसी, साईबाबा चौक, देवदत्त टॉवर, बुधले गल्ली, शांतीनगर, भवानी पेठ, मंत्री चंडक, होटगी रोड, भागवत चौक, मुरारजी पेठ, स्वागत नगर, कुमठा नाका, गुरुवार पेठ, उत्तर सदर बझार, मंत्री चंडक नगर, साई विहार सोसायटी, शिवसृष्टी नगर, सैफूल, आसरा हौसिंग सोसायटी, मानस अर्पाटमेंट, एम्प्लॉयमेंट चौक, मंत्री चंडक नगर, भवानी पेठ, कल्याण नगर, जुळे सोलापूर, सोनिया नगर, कलबल अर्पाटमेंट, मुरारजी पेठ, यलगुलवार शाळेजवळ, श्रध्दा आकांक्षा सोसायटी, भूषण नगर, लिमयेवाडी, साठे-पाटील वस्ती, जुना देगाव नाका, हाजी हजरत खान चाळ, मुरारजी पेठ आणि न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक याठिकाणी शनिवारी (ता. 27) नव्या 57 रुग्णांची भर पडली आहे. 

सोलापूर : सोलापूर शहरात शनिवारी (ता. 27) 57 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी दक्षिण कसबा परिसरातील 65 वर्षीय महिला तर औसे वस्ती येथील 76 वर्षीय पुरुष, तेलंगी पाच्छा पेठेतील 57 वर्षीय पुरुष आणि हब्बू वस्ती येथील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 34 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

आतापर्यंत सोलापूर शहरातील दोन हजार 141 व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 271 व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे मृत्यू आणि कोरोना पॉझिटिव्ह सापडणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. आतापर्यंत शहरातील 173 पुरूष तर 98 महिला कोरोनामुळे मयत झाल्या आहेत. दुसरीकडे एक हजार 306 पुरुषांना कोरोनाची लागण झाली असून 835 महिलांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेल्या मूलमंत्रानुसार महापालिका उद्यापासून (रविवार) ठोस पावले उचलणार आहे. 

शनिवारी येथे सापडले नवे रुग्ण 
बुधले गल्ली, बाळीवेस, दक्षिण कसबा, गंभीरे मंगल कार्यालयाजवळ, आसरा सोसायटी, दत्त नगर, जुळे सोलापूर, नंदिनगर, विजयपूर रोड, भवानी पेठ, दक्षिण सदर बझार, किसान नगर, अक्‍कलकोट रोड, सागर चौक, विडी घरकूल, शिवगंगा नगर, शेळगी, रुबी नगर, जुळे सोलापूर, एकता नगर, शाहीर वस्ती, भवानी पेठ, विद्याविहार, रेल्वे लाईन, अशोक नगर, विजयपूर रोड, हब्बु वस्ती, देगाव नाका, पद्मानगर, पाच्छा पेठ, अंबाबाइ मंदिरामागे, रामवाडी, विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, गीता नगर, एमआयडीसी, साईबाबा चौक, देवदत्त टॉवर, बुधले गल्ली, शांतीनगर, भवानी पेठ, मंत्री चंडक, होटगी रोड, भागवत चौक, मुरारजी पेठ, स्वागत नगर, कुमठा नाका, गुरुवार पेठ, उत्तर सदर बझार, मंत्री चंडक नगर, साई विहार सोसायटी, शिवसृष्टी नगर, सैफूल, आसरा हौसिंग सोसायटी, मानस अर्पाटमेंट, एम्प्लॉयमेंट चौक, मंत्री चंडक नगर, भवानी पेठ, कल्याण नगर, जुळे सोलापूर, सोनिया नगर, कलबल अर्पाटमेंट, मुरारजी पेठ, यलगुलवार शाळेजवळ, श्रध्दा आकांक्षा सोसायटी, भूषण नगर, लिमयेवाडी, साठे-पाटील वस्ती, जुना देगाव नाका, हाजी हजरत खान चाळ, मुरारजी पेठ आणि न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक याठिकाणी शनिवारी (ता. 27) नव्या 57 रुग्णांची भर पडली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 57 patients found in Solapur on Saturday