सोलापूर शहरात 59 नवे कोरोनाबाधित 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

सोलापूर ः सोलापूर शहरामध्ये आज 59 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज केवळ 288 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 229 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 57 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव आलेल्या अहवालामध्ये 40 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर आज कोरोनामुक्त होऊन 52 जण सुखरूप घरी पोहोचले आहेत. आज केवळ एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मयत झालेली व्यक्ती ही भवानी पेठ परिसरातील 66 वर्षाचे पुरुष आहेत. 

सोलापूर शहरामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या आठ हजार 358 एवढी झाली आहे. आजपर्यंत 468 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. कोरोनाग्रस्त असलेले 887 जण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. सात हजार तीन जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

या भागात आढळले नवे रुग्ण 
बजरंग नगर मजरेवाडी, स्वामी विवेकानंद नगर हत्तुरे वस्ती, उत्तर कसबा, कुमार नगर विजापूर रोड, इंद्रधनू अपार्टमेंट, सुभाष नगर, नवी पेठ, पापाराम नगर विजापूर रोड, अश्विनी कॉम्प्लेस, वसुंधरा सोसायटी, सोमवार पेठ, विडी घरकुल, विजापूर रोड, न्यू पाच्छापेठ, मंत्री चंडक पार्क विजापूर रोड, आसरा हौसिंग सोसायटी, जुने आरटीओ ऑफिसजवळ, वसंत नगर पोलिस लाइन, वर्धमान हाईटस, दक्षिण कसबा, वसंत विहार, राघवेंद्र नगर विजापूर रोड, नालंदानगर, बसवेश्वर नगर शेळगी, गीतानगर, आत्मविश्वास नगर माशाळ वस्ती, लक्ष्मीनगर जुळे सोलापूर, भिमनगर सोरेगाव, रोहिणीनगर सैफुल, सूर्योदय हाईटस वसंत विहार जुना पुना नाका, रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ, कुमठे गाव, म्हाडा कॉलनी जुळे सोलापूर, भाग्योदय हौसिंग सोसायटी कुमठा नाका, भारतमाता नगर मजरेवाडी, लष्कर आपार्टमेंट होटगी रोड, होटगी रोड, वानकर वस्ती, दमाणी नगर, राधे कृष्णा अपार्टमेंट विद्यानगर, डी ग्रुप विडी घरकुल, ढंगे रेसिडेन्सी, पश्‍चिम मंगळवार पेठ, विमल कॉम्प्लेक्‍स माशाळ वस्ती, रेल्वे लाईन या भागामध्ये आज नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 59 new corona affected in Solapur city