सोलापूरच्या ग्रामीण भागात 601 कोरोनाबाधित; 13 जणांचा झाला मृत्यू 

संतोष सिरसट 
Sunday, 13 September 2020

बाधितांची तालुकानिहाय संख्या कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 788 (48), बार्शी- 3383 (125), करमाळा- 1197 (28), माढा- 1632 (53), माळशिरस- 2303 (50) मंगळवेढा- 816 (15), मोहोळ- 772 (33), उत्तर सोलापूर- 575 (25), पंढरपूर- 3684 (81), सांगोला- 1059 (12), दक्षिण सोलापूर- 1131 (24), एकूण-17339 (494) 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या दररोज 350 ते 600 च्या दरम्यान होत आहे. आज पुन्हा एकदा ग्रामीण भागामध्ये 601 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर आज कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 
ग्रामीण भागामध्ये आज तीन हजार 998 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन हजार 397 जणांचे अहवाल हे निगेटिव आले तर 601 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे आज 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 494 इतकी झाली आहे तर आत्तापर्यंत बाधितांची संख्या 17 हजार 339 एवढी झाली आहे. 

तामशेवाडी (ता. माळशिरस) येथील 74 वर्षे पुरुष, इर्लेवाडी (ता. बार्शी) येथील 65 वर्षाची महिला, होनमुर्गी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 74 वर्षाचे पुरुष, नाझरे (ता. सांगोला) येथील 50 वर्षांचे पुरुष, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 42 वर्षांचे पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 53 वर्षाचे पुरुष, जेऊर (ता. करमाळा) येथील 75 वर्षांचे पुरुष, देगाव (ता. पंढरपूर) येथील 50 वर्षाचे पुरुष, भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील 62 वर्षाचे पुरुष, फुले प्लॉट बार्शी येथील 70 वर्षाचे पुरुष, भोसे (ता. पंढरपूर) येथील 55 वर्षाची महिला, तांदुळवाडी (ता. माढा) येथील 70 वर्षाचे पुरुष तर अनिल नगर पंढरपूर येथील 62 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 601 coronated in rural Solapur; 13 people died today