esakal | 'सिंहगड'मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने घेतला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

HospiBuz_Covid-19-Breakthrough-compressor.jpg

कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दगडू गोविंद अंकुश (वय 62) हे उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले. मात्र, त्यांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शनिवारी (ता. 17) रात्री साडेसातच्या सुमारास केगाव येथील सिंहगड क्‍वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले होते.

'सिंहगड'मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने घेतला गळफास

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : केळगाव येथील सिंहगड क्‍वारंटाईन सेंटरमध्ये 62 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 19) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दगडू गोविंद अंकुश (वय 62) हे उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले. मात्र, त्यांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शनिवारी (ता. 17) रात्री साडेसातच्या सुमारास केगाव येथील सिंहगड क्‍वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रविवारी रात्री त्यांच्यासाठी घरून जेवणाचा डबा आणला होता. रात्री जेवण करून झोपल्यानंतर त्यांनी बाथरूममध्ये जाऊन गळफास घेतला. तत्पूर्वी, रविवारी (ता. 18) रात्री डॉक्‍टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणीही केली होती. सोमवारी सकाळी त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्‍टर त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी आतून दरवाजा उघडत नसल्याने डॉक्‍टरांना संशय आला. डॉक्‍टरांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडला. त्यावेळी दगडू अंकुश यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असून त्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध आता सुरू झाला आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.