67 वर्षाचा "तरुण'" करतोय दररोज 1200 मिटर स्विमिंग 

shankar karajgi.jpg
shankar karajgi.jpg
Updated on

सोलापूरः तरुणपणी लागलेला जलतरणाचा छंद मला कायम तरुण ठेवणारा ठरला. रोजच्या नियमित बाराशे मिटर जलतरण करत असताना या छंदाने मला अजूनतरी कधी मला थकवा जाणवला नाही. शरिराला लागलेली जलतरणाची सवय कायम ठेवत असताना आज वयाच्या 67 व्या वर्षीदेखील मी नियमित सराव व स्पर्धामध्ये सहभाग घेऊ शकतो, ही भावना जलतरणपटू शंकर करजगी यांनी व्यक्त केली. 


विजापूर रोड भागातील इंदिरा नगरचे रहिवासी असलेले शंकर करजगी हे त्यांच्या जलतरणाच्या छंदाबद्दल बोलत होते. मी लहानपणी जलतरणाबद्दल जागरुक नव्हतो. नंतर महाविद्यालयीन जीवनात अचानक पोहण्याची आवड असलेले मित्र भेटले. मग स्वतःचा टॅंकवर जाऊन पोहणे शिकून घेतले. नंतर मित्रांसोबत नियमित पोहू लागलो. त्यावेळी जुबेर आमेरिया हे जलतरण संघटनेचे प्रेसिडेंट होते. त्यांची प्रेरणा होती. या पोहण्यासोबत मी बटरफ्लाय, बॅंक स्ट्रोक, प्री स्ट्रोक व फ्री स्टाईल हे चारही प्रकार शिकलो. पोहण्याचा सराव वाढत चालला होता. शिक्षणासोबत वडिलोपार्जीत व्यवसायाची जबाबदारी आली. या धावपळीतदेखील रोज सकाळी माझी पावले जलतरण तलावाकडे वळायची. त्यामध्ये कधीही खंड पडला नाही. दरवर्षी सरावाच्या वेळी राज्य व राष्ट्रीय स्पर्धाची निमंत्रणे मिळायची. पहिली स्पर्धा नांदेडला खेळण्याची संधी मिळाली. तेव्हापासून व्यवसायात वेळ काढून आवर्जून स्पर्धासाठी देशभरात जात असे. नियमित स्पर्धा हा माझा दिनक्रम बनला. 

नंतर व्यावसायिक जबाबदारी थोडी कमी झाली व मुलेदेखील मोठी झाली. मात्र सरावात कधी खंड पडला नाही. या जलतरणाने ताजेतवानेपणा एवढा वाढला. आपल्याला कोणत्याही थकव्याची जाणीव होतच नाही. या उलट पोहणे झाल्यानंतर पुढील दिवसभराच्या कामात उत्साह वाढत असल्याचा अनुभव कायम येत राहतो. 


जलतरण एक अनुभव 
- पोहण्यामुळे सर्व अवयवांचा नकळत व्यायाम 
- जलतरणानंतर शरीराच्या ताजेतवानेपणात वाढ 
- कंटाळा व आळस या गोष्टींना फारसे स्थान राहत नाही 
- शरीराची स्थिती कायम संतुलित राहण्यास मदत 

बेथलेचे आव्हान वेगळेच 
यामध्ये माझ्या आवडीचा प्रकार म्हणजे बेथले प्रकार अत्यंत वेगळा आहे. यामध्ये सुरुवातीला स्पर्धकाने एक किमी अंतर रनिंग करावी लागते. रनिंग संपले की पाण्यात उडी मारून 100 मीटर जलतरण करायचे. लगेच पुन्हा एक किमी धावणे करायचे. हा तिहेरी प्रकारचा व्यायाम प्रकार खूपच वेगळा आहे. मला या स्पर्धेत संधी मिळाली, तेव्हा मी पुणे येथे झालेल्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com