सोलापूर शहरात 87 जण कोरोनाबाधित; एक जणांचा झाला मृत्यू 

संतोष सिरसट 
Thursday, 10 September 2020

सोलापूर ः शहराच्या कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज 606 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 519 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 87 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरामध्ये आतापर्यंत बाधित झालेल्या लोकांची संख्या सात हजार 304 एवढी झाली आहे. आज कोरोनामुळे एक जणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत एकूण 436 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात अद्यापही 808 जण उपचार घेत असून सहा हजार 60 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सोरोगाव परिसरात राहणाऱ्या 70 वर्षाच्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 

या भागात आढळले नव्याने कोरोनाबाधित रुग्ण 
सोलापूर शहरामध्ये कर्णिक नगर, मल्लीकर्जून नगर अक्कलकोट रोड, कल्याण नगर भाग नंबर दोन, गुरूनानक चौक, राजेशकुमार नगर होटगी रोड, शुक्रवार पेठ, लष्कर शिवगंगा नगर भाग नंबर पाच, कुमठा नाका, सोलापूर कारागृह, नवोदय रेजन्सी होटगी रोड, जोडभावी पेठ, स्वातंत्र्य सैनिक नगर रेल्वे लाईन, अंत्रोळीकर नगर भाग नंबर एक, मंत्री चंडक नगर भवानी पेठ, दक्षिण कसबा शिंदे चौक, अशोक नगर होटगी रोड, इंद्रधनू मरीआई चौक, थोबडे वस्ती सोलापूर, उत्तर कसबा, उत्तर सदर बझार सातरस्ता, निराळे वस्ती मुरारजी पेठ, हिरेहब्बू कॉम्प्लेक्‍स. स्वामी विवेकानंद नगर, आदित्य नगर, आसरा सोसायटी, शेळगी, एकतानगर, तोडकर वस्ती बाळे, गणेश नगर बाळे, रामचंद्र एम्पायर अशोक चौक, मल्लिकार्जून नगर स्वागत नगर, पोलिस क्वार्टर कुचन नगर, केदारनाथ रेसिडेन्सी मुरारजी पेठ, स्नेहल पार्क जुळे सोलापूर, शिवगंगा नगर जुळे सोलापूर, जवान नगर विजापूर रोड, कमला नगर विजापूर रोड, आसरा चौक सोलापूर, स्वामी विवेकानंद नगर सैफुल, विजापूर रोड, दक्षिण सदर बझार लष्कर, वसंत विहार पुना नाका, वैष्णवी नगर विजापूर रोड, मंगल विहार जुळे सोलापूर, विजय देशमुख नगर निर्मिती विहार, वैष्णवी अपार्टमेंट मजरेवाडी, उदय अपार्टमेंट, जुना वांगी रोड, वसंत नगर विजापूर नाका, टिळक चौक, शुक्रवार पेठ, शिंदे कॉलनी मुरारजी पेठ, समर्थ नगर दहिटणे, एन. जी. मिल चाळ, रोहिणी नगर भाग नंबर दोन, गावठाण शेळगी, जवाहननगर, धोंडिबा वस्ती या भागामध्ये आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 87 coroned in Solapur city; One died