सिध्देश्‍वर कारखान्याजवळ अपघात ! काम आटोपून गावी निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाने वाटेतच गाठले

तात्या लांडगे
Sunday, 18 October 2020

सोलापरहून काम आटोपून स्वत:च्या दुचाकीवरुन आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे गावी निघालेल्या भिमाशंकर बाबुराव विधाते (वय 65) यांना वाटेतच काळाने गाठले. श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याजवळ ट्रकने धडक दिल्यानंतर विधाते यांच्या डोक्‍याला जबर मार लागला. या अपघातात गंभीर जखमी झालेले विधाते यांनी जागेवरच प्राण सोडला. 

 सोलापूर : सोलापरहून काम आटोपून स्वत:च्या दुचाकीवरुन आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे गावी निघालेल्या भिमाशंकर बाबुराव विधाते (वय 65) यांना वाटेतच काळाने गाठले. श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याजवळ ट्रकने धडक दिल्यानंतर विधाते यांच्या डोक्‍याला जबर मार लागला. या अपघातात गंभीर जखमी झालेले विधाते यांनी जागेवरच प्राण सोडला. हा अपघात दुपारी साडेचारच्या सुमारास घडल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. 

 

अपघातानंतर घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली. अपघातात जखमी भिमाशंकर विधाते यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. अपघातात विधाते यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली होती. तर त्यांच्या खांद्याला व हातालाही मार लागला होता. त्या परिसरातील गतिरोधकजवळ आल्यानंतर दुचाकीचा वेग कमी केल्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याची चर्चा परिसरात होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. पेठकर हे पुढील तपास करीत आहे. विधाते यांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली असून ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचेही एमआयडीसी पोलिसांकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident near shri Siddheshwar shugar factory; Two-wheeler killed in truck crash