esakal | भगीरथ भालकेंना उमेदवारी द्या अन्यथा वेगळा विचार करू ! कार्यकर्ते आक्रमक; दिला राष्ट्रवादीच्या पक्ष निरीक्षकांना इशारा

बोलून बातमी शोधा

Bhagirath}

उमेदवारीचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांना द्यावी, अन्यथा कार्यकर्ते वेगळा विचार करतील, अशी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी घेतली आहे. 

solapur
भगीरथ भालकेंना उमेदवारी द्या अन्यथा वेगळा विचार करू ! कार्यकर्ते आक्रमक; दिला राष्ट्रवादीच्या पक्ष निरीक्षकांना इशारा
sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत अनेक दिवसांपासून खल सुरू आहेत. तरीही उमेदवारीचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांना द्यावी, अन्यथा कार्यकर्ते वेगळा विचार करतील, अशी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी घेतली आहे. 

कार्यकर्त्यांनी आपल्या भावना पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांच्यासमोर व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या भावना रास्त आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत त्या पोचवल्या जातील असे आश्वासन पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांनी दिले. 

विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी निरीक्षक सुरेश घुले यांच्या उपस्थितीत भालके यांच्या निवासस्थानी आज दुपारी बैठक झाली. त्यात पक्षाच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीची उमेदवारी भगीरथ भालकेंना द्यावी, अशी एकमुखी मागणी केली. 

विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक श्री. घुले यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. 

या वेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक विजयसिंह देशमुख, शालिवाहन कोळेकर, माजी सरपंच मारुती मासाळ, माजी नगरसेवक नागेश यादव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षकांसमोर दिवंगत आमदार भालके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी द्यावी; अन्यथा कार्यकर्ते वेगळा विचार करतील, अशा भावनाही व्यक्त केल्या. 

या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे, प्रवक्ते उमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष गणेश पाटील, तालुकाध्यक्ष दीपक पवार, शहराध्यक्ष सुधीर भोसले, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता माने, तालुकाध्यक्षा अनिता पवार, "विठ्ठल'चे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, संचालक मोहन कोळेकर, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप मांडवे आदी उपस्थित होते. 

विजयसिंह देशमुखांना अध्यक्षपद देण्याची मागणी 
या बैठकीत नुकत्याच झालेल्या पक्ष पदाधिकारी निवडीचेही पडसाद उमटले. कासेगाव येथील विजयसिंह देशमुख यांना तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी कासेगाव व परिसरातील कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांच्याकडे केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनीही, लवकरच श्री. देशमुख यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल