Again the possibility of a lockdown has caused a great deal of confusion among the migrant workers and farmers
Again the possibility of a lockdown has caused a great deal of confusion among the migrant workers and farmers

पुन्हा लॉकडाउनच्या चर्चेने शेतकऱ्यांची उडाली भंबेरी

अक्कलकोट (सोलापूर) : कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण जनजीवन हवालदिल झाल्याने सरकारने गेल्या वर्षात लॉकडाउन जाहीर केले. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली व लसही उपलब्ध झाल्याने निर्बंध टप्याटप्याने कमी झाले. अशातच कोरोनाचा कहर कमी झाल्याचा गैरसमज करुन घेऊन सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाची पायमल्ली करत जनतेनेही बेफिकीरीने वागणे सुरु केले. मनुष्यहानी, आर्थिक हानी व त्याचबरोबर अनेक संकटे झेलून जनजीवन सावरत असताना पुन्हा कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने सरकारने पुन्हा रात्रीची संचारबंदी व निर्बंध वाढविले व पुन्हा लॉकडाउनच्या शक्‍यतेने कष्टकरी-मजूर स्थलांतरीत व शेतकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. 

मोहोळमध्ये महिलांनी चाकूचा धाक दाखवून लुटले; तिघींना अटक
 
विनामास्क बाहेर पडणे, लग्नसमारंभ, घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम व गर्दीच्या ठिकाणी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याने आटोक्‍यात आलेला कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेले वर्षभर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या मध्यमवर्गीयांची ससेहोलपट पाहता पुन्हा लॉकडाउन होणे परवडणारे नाही. सरलेल्या वर्षात शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल शेतातच सडून गेल्याने व पूर्ण बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते.

लॉकडाउनने व्यापारी वर्गही नुकसानीच्या गर्तेत असताना कामगारांच्या हाताला काम देणे जिकीरीचे बनले आहे आणि त्यातच पुन्हा लॉकडाउन झाल्यास व्यापार-उद्योगधंदे बंद पडतील व बेरोजगारीत वाढ होईल. सरत्या आर्थिक वर्षात नियोजन व अर्थकारण बिघडल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाव, जिल्हा, राज्य सोडून गेलेल्या कुशल-अकुशल कामगारांच्या आप्तेष्टांना पुन्हा लॉकडाउन झाल्यास गेल्या वेळेसारखे हाल होईल का या शंकेने सारेचजण धास्तावले आहेत. 

आरोग्य व्यवस्था सक्षम करुन लॉकडाउनवर शासनाने उपाय योजले पाहिजेत. लॉकडाउन हा सक्षम पर्याय होऊ शकत नाही. सगळ्यात जास्त व्यापारी मध्यमवर्गीय व स्थलांतरीतेचे हाल झालेले असून शासनाकडून लॉकडाउनऐवजी पर्यायी बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. 
- महिबूब मुल्ला, माजी सभापती, पंचायत समिती, अक्कलकोट 

भारतात सगळ्यात मोठा असलेल्या मध्यमवर्गीय समाजामध्ये व्यापारीवर्गाचे भरायचे बॅंकांचे हप्ते, घरखर्च भागविणे ह्यातच दमछाक झाली आहे. शासनाकडून व्यापारी वर्गांना कोणतीही मदत मिळाली नसल्याने पुन्हा लॉकडाउन झाल्यास मध्यमवर्ग, व्यापारी देशोधडीला लागेल व अर्थव्यवस्थेवरही याचे गंभीर परिणाम होतील. 
- विजयकुमार पाटील, उद्योजक, अक्कलकोट स्टेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com