esakal | अखेर... श्री विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
sakal

बोलून बातमी शोधा

Shri Vitthal Mandir pandrpur

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, आषाढी यात्रेमध्ये श्री विठ्ठल रूक्‍मिणी मातेची प्रक्षाळपुजा रूढी व परंपरेनुसार झाली. या पूजेच्या बाबतीत काही तक्रारी आल्यानंतर मंदिर समितीने सभा घेवून अधिकारी व कर्मचारी यांना बाजू मांडण्याची संधी न देता गाभारा बंदीची एकतर्फी कारवाई केली होती. ही केलेली कारवाई तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा 1 ऑगस्टपासून मंदिर समितीकडील सर्व कर्मचारी सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन करतील, असा इशारा श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर कर्मचारी संघ पंढरपूर यांनी दिला होता.

अखेर... श्री विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल मंदिरातील प्रक्षाळ पूजेच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादामुळे संबंधित अधिकाऱ्यांना गाभारा बंदी करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्याने कर्मचाऱ्यांनी एक ऑगस्टपासून काम बंदचा इशारा दिला होता. आज समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी दूरध्वनीवरून कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी जाहीर केला आहे. 

यासंदर्भात श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, आषाढी यात्रेमध्ये श्री विठ्ठल रूक्‍मिणी मातेची प्रक्षाळपुजा रूढी व परंपरेनुसार झाली. या पूजेच्या बाबतीत काही तक्रारी आल्यानंतर मंदिर समितीने सभा घेवून अधिकारी व कर्मचारी यांना बाजू मांडण्याची संधी न देता गाभारा बंदीची एकतर्फी कारवाई केली होती. ही केलेली कारवाई तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा 1 ऑगस्टपासून मंदिर समितीकडील सर्व कर्मचारी सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन करतील, असा इशारा श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर कर्मचारी संघ पंढरपूर यांनी दिला होता.

याबाबत सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी आज दुरध्वनीद्वारे चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मंदिर समितीच्या 30 किंवा 31 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत देण्यात येणार होती. तथापि पंढरपूर शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व पंढरपूर शहरात 10 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन होणार असल्याने मंदिर समितीच्या सदस्य मंडळींना बैठकीसाठी पंढरपूर शहरात येणे शक्‍य नाही.

त्यामुळे मंदिर समितीची बैठक 10 ऑगस्ट पूर्वी घेणे अशक्‍य आहे. मात्र 15 ऑगस्ट पूर्वी मंदिर समिती बैठक आयोजित करून त्या बैठकीत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले व तोपर्यंत आपले आंदोलन स्थगित करावे, असे सुचित केले. त्यामुळे नियोजित काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

आंदोलनाचा पर्याय खुला...  

दरम्यान, 15 ऑगस्ट पूर्वी मंदिर समितीची बैठक घेवून अधिकारी व कर्मचारी यांना केलेली गाभारा बंदी मागे न घेतल्यास आम्हाला आंदोलन करण्याचा पर्याय खुला राहील, असेही श्री. राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

संपादन -  सुस्मिता वडतिले 

go to top