कृषीमंत्री दादा भुसे आज सोलापुरात 

प्रमोद बोडके
Sunday, 18 October 2020

कृषीमंत्री दादा भुसे आज (रविवार, ता. 18) सायंकाळी 6 वाजता सोलापुरातील शासकिय विश्रामगृहात येणार आहेत. अतिवृष्टी व महापुराबाबत ज्यांना निवेदने द्यायची आहेत त्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी 6 वाजता सोलापुरातील शासकिय विश्रामगृहात उपस्थित रहावे. 
- गणेश वानकर, जिल्हाप्रमख, शिवसेना 

सोलापूर : राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे आज (रविवार, ता. 18) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी 6 वाजता सोलापुरातील सात रस्ता येथील शासकिय विश्रामगृहात त्यांचे आगमन होणार आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उद्या (सोमवार, ता. 19) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कृषीमंत्री दादा भुसे आज सोलापुरात येत आहेत. 

अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी, माळशिरस, मोहोळ या तालुक्‍यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, पुरुषोत्तम बरडे यांनी सोलापुरातील शासकिय विश्रामगृहाची आज सकाळी पाहणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Minister Dada Bhuse in Solapur today