विशेष किरकोळ रजेचे आदेश नाहीत
पदवीधर मदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान आहे. मतदान करण्यासाठी राज्य शासनाचे विशेष किरकोळ रजेचे आदेश आहेत. परंतु, हे आदेश अद्याप शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांना विभागीय शिक्षण सहसंचालकांकडून मिळालेले नाहीत. आदेश प्राप्त झाल्याशिवाय संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्य विशेष किरकोळ रजेचे आदेश काढू शकत नाहीत. त्यामुळे विभागीय शिक्षण संचालक राजश्री देशपांडे यांनी तातडीने आदेश काढावेत, अशी मागणी सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र गोटे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सोलापूर : महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मकता दर्शविल्याने सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनने पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला आहे. आता युनियनने महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड व शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
विशेष किरकोळ रजेचे आदेश नाहीत
पदवीधर मदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान आहे. मतदान करण्यासाठी राज्य शासनाचे विशेष किरकोळ रजेचे आदेश आहेत. परंतु, हे आदेश अद्याप शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांना विभागीय शिक्षण सहसंचालकांकडून मिळालेले नाहीत. आदेश प्राप्त झाल्याशिवाय संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्य विशेष किरकोळ रजेचे आदेश काढू शकत नाहीत. त्यामुळे विभागीय शिक्षण संचालक राजश्री देशपांडे यांनी तातडीने आदेश काढावेत, अशी मागणी सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र गोटे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कॉलेज कर्मचारी युनियनने पत्रकार परिषद घेऊन सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनर्जिवित करून सातव्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. तर विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याचीही मागणी केली होती. या मागणीसाठी कर्मचारी युनियनने निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत तातडीची बैठक लावून पुढील कार्यवाहीचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे सोलापूर कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या या सकारात्मक धोरणाचे स्वागत केले. त्यानंतर युनियनचे अध्यक्ष राजेंद्र गोटे, उपाध्यक्ष दत्ता भोसले, कार्याध्यक्ष राजेंद्र गिड्डे, सरचिटणीस अजितकुमार संगवे, आनंद व्हटकर व महेश सुरवसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार लाड व शिक्षक आमदार सावंत यांना निवडून देण्याचे आवाहन केले.