अक्कलकोट भाजपने ठोकले महावितरण कार्यालयास टाळे ! 

Akt bjp
Akt bjp

अक्कलकोट (सोलापूर) : महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांचे वीज कनेक्‍शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे काम करण्याच्या कृत्याच्या निषेधार्थ अक्कलकोट शहर व तालुका भाजपच्या वतीने आज (शुक्रवारी) आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. 

सोलापूर बायपास रस्त्यावर महावितरण कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, महेश हिंडोळे, यशवंत धोंगडे, प्रभाकर मजगे, अप्पासाहेब पाटील, अप्पासाहेब बिराजदार, राजेंद्र बंदीछोडे, खय्युम पिरजादे, गुंडप्पा पोमाजी, राजशेखर मसुती, शिवशरण वाले, मीलन कल्याणशेट्टी, अप्पू परमशेट्टी, अप्पू कौटगी, श्रीशैल नंदर्गी, परमेश्वर यादवाड, दयानंद बिडवे, रमेश कापसे, श्रीशैल ठोंबरे, सुरेखा होळीकट्टी, बाळा शिंदे, नागराज कुंभार, दयानंद बमनळी, प्रदीप पाटील, शंकर उणदे, धोंडप्पा बनसोडे, स्वामीनाथ घोडके, सुधीर मचाले, अविनाश पोतदार, विनोद मोरे, सुनील गवंडी, सचिन पवार, कांतू धनशेट्टी, बबलू कामनूरकर, छोटू पवार, अंबण्णा चौगुले, आलम कोरबू, परमेश्वर झळकी, सोन्या बापू शिंदे, गेनसिद्ध पाटील, बसवराज हौदे, हणमंत कलशेट्टी, सुनिल सावंत, इरण्णा, बिराजदार, सोमनाथ पाटील, विशाल उडचाण, शिवप्पा हिळ्ळी, संतोष आळगी, भीमा तोरणगी, दिपक जरीपटके, स्वामीनाथ घोडके, शिवशंकर स्वामी, संकेत कुलकर्णी, राहूल वाडे, लखन झंपले, आणप्पा बिराजदार आदींची उपस्थिती होती. 

या वेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, अक्कलकोट तालुका हा सतत कमी पावसाच्या दुष्काळसदृश पट्ट्यात येतो. या ठिकाणचा शेतकरी हा कष्टकरी असूनही वेळी - अवेळी निर्सगाच्या अवकृपेला बळी पडणारा आहे. त्यामुळे तो नेहमी कर्जाच्या खाईत लोटलेला असतो. यावर्षी कधी नव्हे तो चांगला पाऊस झाला आणि काही तरी पीक करून कर्जातून बाहेर यावे तर शासनाच्या वक्रदृष्टीने वीजबिल नाही भरले तर कनेक्‍शन तोडण्याची नोटीस देण्यात येत आहे. ही मोहीम चुकीची असून यातून त्वरित दिलासा द्यावा आणि यातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. हा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर यापेक्षा खूप मोठे आंदोलन येत्या काळात केले जाणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com